पुस्तक परिक्षण: जॉनी गॉन डाऊन
लेखक: करण/न बजाज
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Harper Collins
"किप ऑफ द ग्रास" या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखकाचे म्हणजेच करण/न बजाजचे हे दुसरे पुस्तक. वर म्हटल्या प्रमाणे प्रोलॉग अगदी प्रॉमिसिंग आहे. एखाद्या इंग्रजी सिनेमा असल्यासारखं पुस्तक कथेच्या मध्यातुन सुरू होतं. एक हात गमावलेला, अंगावर अगदी मळके कपडे असलेला कथेचा नायक भारतीय रेल्वेतुन प्रवास करत असतो. सहजच रेल्वेतील सहप्रवाशांशी गप्पा होतात. कथेचा नायक अगदी शांत, कदाचित "जीवनाच्या परम सत्यापर्यंत" पोहचल्यासारखा गंभीर असा वर्णीला आहे. रेल्वेतील संभाषणात तो "फ़ॉरेन रिटर्न" आहे हे सहप्रवाशांना पटत नाही. इतकी दयनीय अवस्था पाहता हे शक्यच नाही असा काहींचा समज होतो तर एक गृहस्थ, "बघा, परदेशात जाऊन ही अवस्था होत असेल तर त्यापेक्षा भारतच बरा" असा टोमणाही मारून जातात. पण नायकाला त्याची फिकिर नसते. तो अलिप्त असतो. त्याच्या क्वचितच बोलण्यात तो स्वतः "MIT" या जगविख्यात इंजिनिअरिंग कॉलेजचा ग्रॅज्युएट असल्याचे सांगतो आणि तेथुन पुढे कथा सुरुवातिला येते.
कथेची सुरुवात आणि प्रोलॉगची स्टाईल नकळतच चेतन भगतच्या "फाईव्ह पॉईंट समवन"ची आठवण करून देते. साधारण त्याच धाटणीची लेखन शैली, त्याच पद्धतीचे "कॉलेज लाईफ" संवाद, वाचायला मिळतात. फरक एवढाच आहे की या पुस्तकात "फ"काराने सुरू होणार्या शिव्या आणि नंतर ब्राझीलमध्ये नायक वास्तव्याला असताना टिपिकल माफ़िया स्टाईलच्या लेखनामुळे आलेले भरपुर "सेंसॉर्ड" शब्द मुक्त हस्ताने वापरले आहेत. त्यामुळे "जेंटलमन" वाचक वर्गाला कदाचित ते पचणार नाही. ;)
तर कथेची सुरुवात MIT च्या कॉन्व्होकेशन सेरेमोनीत होते. कथेचा नायक निखिल आणि लंगोटीयार सॅम यांचे भन्नाट संवाद खरोखर मजा आणतात.या दरम्यान ते कंबोडियाला सुट्टी एंजॉय करायचा प्लॅन करतात. कंबोडिया का तर स्वस्त आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे तेथे व्हिसा लागत नाही म्हणून. दरम्यान निखिल NASA मध्ये सिलेक्ट झालेला असतो तर सॅम GE (General Electric)मध्ये. थोडक्यात दोघेही मोठ्या कंपनीत सिलेक्ट झालेले असतात.
आणि कथेला कलाटणी मिळते जेव्हा ते कंबोडियात येतात. कंबोडियाची सध्याची राजकीय परिस्थिती न पाहता ते तेथे दाखल होतात आणि मग सर्व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. कंबोडियात राजकिय अस्थिरता असते आणि ज्यामुळे नव्याने हुकुमशाहा उदयास आलेला असतो. जो त्याच्या वाटेत येईल ते सर्व उध्वस्त करत सुटलेला असतो. आणि अशा बिकट स्थितीत हे दोघे तेथे जातात. लवकरच स्थितीचे गांभीर्य़ त्यांच्या लक्षात येते. केवळ सॅमच्या हट्टापायी ते येथे आलेले असतात ज्यामुळे सॅमला प्रचंड मनस्ताप होतो. बर्याच गोष्टी घडतात. मग ते मदतीसाठी अमेरिकन एंबसीत जातात आणि तिथे लक्षात येते की निखिलचाच पासपोर्ट NASA ने अमेरिकी नागरिक म्हणून केलेला असतो तर GE ने अजुन सॅमला तसा पासपोर्ट दिलेला नसतो. आणि भारतीय एंबसीच तेथे नसते. तेव्हा निखिल मनाचा मोठेपणा दाखवून आणि उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत सॅमला स्वतःचा पासपोर्ट देतो आणि त्याला अमेरिकेला परत पाठवतो आणि स्वतः इतर नॉन अमेरिका पासपोर्ट धारकांबरोबर जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो.
तो कंबोडियन हुकुमशाही सैनीकांकडे पकडला जातो. १० वर्ष त्याचे भयानक हाल केले जातात. केले गेलेले हाल वाचताना अंगावर काटा येतो. तरिही तो त्यातुन पळ काढण्यात यशस्वी होतो. दरम्यान त्या छळात तो स्वतःचा एक हातही गमावतो. नंतर तो रात्रंदिवस पळत-पळत थायलंडला पोहोचतो. तेथे तो बुद्ध धर्मगुरू होतो. ७-८ वर्ष धर्माची शिकवण घेतली तरी त्याचे मन त्यात रमत नाही. ते सर्व सोडून तो ब्राझील मधे जातो. तेथे त्याची भेट ड्रग माफिया मार्कोशी होते. एका कठीण प्रसंगी तो मार्कोचा जीव वाचवतो आणि लवकरच त्याचा पक्का मीत्र बनतो. बुद्धीच्या जोरावर तो मॉर्कोला नवा बिजनेस तयार करून देतो ज्यामुळे मॉर्को श्रीमंतीची शिखरे सर करतो. हळू हळू तो नकळत ब्राझीलमध्ये एक डॉन/माफिया म्हणून ओळखला जाऊ लागतो. माफिया बनल्यामुळे साहजीकच सतत जीवाशी खेळ. बर्याच गोष्टी घडतात ज्यामुळे त्याला ब्राझील सोडावे लागते व अमेरिकेत पुन्हा पळ काढावा लागतो. दरम्यान त्याला त्याचे प्रेम मिळते, मुल होते पण त्यांना सोडून त्याला अमेरिका गाठावी लागते.
मनावर सतत झालेला छळ, मिळालेली धर्मगुरूंची शिकवण आणि मनुष्यप्राण्याची पाहिलेली नवी रुपे त्याला गंभीर, घाबरट बनवतात. अमेरिकेत तो एका कंप्युटर गीक/किडयाला भेटतो. हळू हळू प्रोग्रामिंग शिकतो.पुन्हा स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर करोडो रुपये मिळवता येतिल अशी वेबसाईट बनवतो पण पुन्हा स्वतः कही प्रॉफिट न घेता ती साईट त्या कंप्युटर गीकला सोपवून तो भारतात "मरण्याच्या" उद्देशाने येतो. बर्याच गोष्टी घडतात, आणि एक दिवस तो पुन्हा सॅमला भेटतो......
नंतर काय होते ते मी सांगत नाही. कारण बरच मी आधीच सांगितलं आहे. पण ओव्हरऑल एक छान पुस्तक आहे.
का वाचावे
-पुस्तक स्टार्ट-टु-एंड वाचकाला खिळवुन ठेवते. "पुढे काय" असा सतत प्रश्न वाचकाला पाडण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
-एका भारतिय लेखकाने लिहिलेले माझ्या वाचनात आलेले हे सर्वोत्तम इंग्रजी पुस्तक आहे. वापरलेल्या वाक्यरचना, शब्द खरोखरच जेफ्री आर्चर वगैरे दिग्गज इंग्रजी लेखकांची आठवण करून देतात. तितकेही मुरलेले लेखन नाही पण मी तरी या लेखनावर इंप्रेस झालो.
का वाचू नये
-कथेत नायकाच्या जिवनाला मिळणार्या कलाटण्या, भरपूर योगायोग, जेम्सबॉंड स्टाईलने अशक्य अशा संकटांवर होणारा विजय, इत्यादी गोष्टी पटत नाहीत. एक कथा म्हणून ठीक आहे पण "इमॅजनरी" लेखन असल्याने ह्या उणीवा राहिल्या आहेत.
अद्वैत ...मस्त वाटले तुझी आता पुस्तक वाचण्यातील रुची बघुन..किप इट अप!इंग्रजी वाचतो आहेस..हे ही उत्तम..
ReplyDeleteपुस्तक परिक्षणाचा ब्लॉग मध्ये समावेश केलास हे ही अभिनंदनीय!
फ़क्त एकच सुचवते..पुस्तक परिक्षण म्हणजे पुस्तकाची स्टोरी नको लिहुस...तर त्या वाचलेल्या पुस्तकावर आपली मते आणि ते पुस्तक मला का आवडले अथवा का आवडले नाही यावर लिहिण्याचा प्रयत्न कर....
हा प्रयत्न ही खुप चांगला आहेच..मस्त आवडले..
असाच लिहीत रहा...मी ही वाचेन..
बेस्ट लक!
मनापासून धन्यवाद! :) पुढच्यावेळी या टिप्स नक्की ध्यानात ठेवेन! :)
ReplyDelete