Saturday, March 4, 2017

मी आणि तु ....(भाग ८)

"विकी राव ! कसे आहात आज?" , आज्याने मिश्किलपणे विचारले.
"मी बरा आहे. तुला काय झालय आज?"
"मी शुद्ध बोलन्याची तयारी करतोय."
"बोलन्याची नाही, बो ल ण्या ची! न आणि ण मधला फरक समजतो का? आलाय शुद्ध बोलायला", रोह्याने आपले ज्ञान पाजळले!
"असुंदे. तरीपण मी शुद्ध बोलनारच. sorry बोलणारच! "
"असुंदे नव्हे! असुदेत!" मीही आज्याची खेचायला थांबलो नाही.
"करा चेष्टा गरिबाची. हितं तुमचा भाऊ प्रयत्न करायलाय आनि तुम्हाला चेष्टा सुचालिये", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला.
"हो का? मग आम्हाला कळेल का? की हे प्रयत्न का सुरू आहेत?" , रोह्याने विचारले.
"हे बघ! ह्या नळकांड्यात काय आहे?" , आज्याने माझ्याकडे हात करत रोह्याला प्रश्न केला.
"माझा काय संबंध आता?", मी रागाने विचारले.
"आता तुझ्यासारख्याला जर एखादी पोरगी स्वतःहुन प्रपोज करत्या मग मला का नाही?", आज्याने मला विचारले.
"आता हे मला काय माहित? विचार मुग्धाला"
"इथेच तु चुकलास मित्रा. पन मी शोधुन काढलं reason.", आज्या म्हणाला.
"आणि ते काय आहे?" मी आणि रोह्याने एकदम विचारले.
"शुद्ध भाषा! तु एकदम शुद्ध बोलतोस. मुलिंना शुद्ध बोलणारी लोकं आवडत असावित!", आज्या अभिमानाने बोलला.
"हम्म्म्म्म...! राहुद्या! तुझ्याच्याने होणार नाही!" , मी आज्याला taunt हाणला!
"अरे मग सारिकाला कसा विचारू? ना मी रोह्यासारखा स्कॉलर आहे, ना मिहीर सारखा handsome!", आज्या नाराजिच्या स्वरात बोलला!
"हे बघं. तिला तु आवडत असशिल तर ती स्वतःहुन तुला विचारेल!", मी आपला expert advise दिला.
"ह्यो बघा! लय तारे तोडून आल्यागत शानपन शिकवालाय! नशिब आहे तुझ! मुग्धासारख्या चांगल्या मुलिने स्वतःहुन विचारलं. नायतर मला पुर्ण guarantee आहे, तु शेवटपर्यंत single च मेला असतास! ", आज्या एका दमात बोलून गेला.
"खरचं यार नशिब तर आहेच!", मीही स्वतःला आरश्यात बघत बोललो.

आज जवळ जवळ वर्ष होत आलं होतं, आम्ही दोघे एकत्र येऊन. आता तर अख्ख कॉलेज आम्हाला couple म्हणून ओळखत होतं. काही teachers ना देखिल माहिती झालं होतं. आम्ही कदिही एका मर्यादेच्या बाहेर गेलो नाही. कधी चाळे केले नाहीत. आमच एकमेकांवरचं प्रेम अगदी निर्मळ होतं. पण का कोणास ठाऊक पण काही लोकांना ते कुठतरी खुपत होतं. त्यातल्या त्यात वठारे सरांना. ते एकही संधी सोडत नव्हते comment करण्याची. पहिले काही वेळा मजेत घेतलं पण नंतर नंतर अति होऊ लागलं. एक दिवस attendance सुरू होता. मुग्धा आजारी असल्याने कॉलेजला आली नव्हती,
"मुग्धा परांजपे", वठारे सरांनी तिचे नाव घेतले तसा मी "आजारी आहे. आज आली नाही" म्हणालो.
"अच्छा! मग तु कसा काय आलास आज? कसं करमणार रे तुला?", वठारे सरांनी comment केली. हे नेहमीचेच झाले होते पण आज जरा अतिच झाले! माझाही स्वतःवरचा ताबा सुटला.
"Excuse me Sir! This is none of your business!", मी क्षणात बोलून गेलो.
रोह्याने माझ्याकडे बघितलं आणि पटकन मला बसण्यासाठी हाताला धरून ओढू लागला.
"ओह! बिजनेस! एक पोरगी काय मिळाली, तुझी भाषाच बदलली की", वठारे सर रागाने मला बोलत होते.
"I am sorry sir. पण तुम्हाला यावर बोलण्याचा काहिही अधिकार नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.", इतक्या दिवसांचा राग आपोआप वाट काढत आज तोंडावाटे बाहेर पडत होता.
"Sorry sir. मी विकिच्या वतीने माफी मागतो. सर please जाऊद्या ना. ए विकी. please खाली बस. सर. sorry! please जाऊद्या", रोह्या केविलवाण्या आवाजात विनवणी करत होता. पण आज माझा राग अनावर झाला होता.
"रोह्या तु नको मधे पडूस. कित्येक दिवस झाले मी यांच्या comments ऐकुन घेतोय. खुप ऐकुन घेतलं. आता बास!" , मी रागात बोललो.
"ओह! आता तु मला माझ्या वर्गात कसं वागयचं शिकवणार? मिस्टर विक्रम, आता मला direct प्रिंसिपलच्या केबिन मधे भेटा. मीही बघतोच माझा बिजनेस काय आहे आणि काय नाही.", वठारे सर रागात निघून गेले. 
"विक्या. तु बरोबर केलास. या फुकन्याला कोनतर बोलायलाच पाहिजे होतं.", आज्या माझ्या खांद्यावर हात टाकून बोलला.
"मुर्ख आहेस काय आज्या? आणि तुला कसला माज आलाय रे विक्या? काय गरज होती बोलायची?", रोह्या रागाने मला आणि आज्याला झापत होता.
"रोह्या तु गप बस. त्या वठारेचा काय संबंद नव्हता बोलायचा विकी आनि मुग्धा बद्दल. विक्या, तु नको घाबरू. मी येतो तुज्यासोबत प्रिंसिपलकडं. मी सांगतो त्या वठार्‍याची तक्रार प्रिंसिपलला", आज्या मला धीर देत बोलला.
"अरे मुर्खांनो! तुम्हाला जरातरी अक्कल आहे का? तुम्हाला हे प्रकरण इतक साधं वाटतय का? विकी तुला अंदाज आहे का, की हे प्रकरण तुझ्या आणि मुग्धाच्या घरापर्यंत जाऊ शकतं? आणि तुमच्या दोघांचे नाते तुमच्या घरच्यांना याप्रकारे समजावे हे मला तरी धोकादायक वाटतय!", रोह्या बोलला तसा माझ्या पोटात गोळा आला. खरच मी याचा विचार केला नव्हता!
"आयला. स्कॉलर खर बोलतोयसकी! मला हे ध्यानातच नाइ! आता काय करायच?" , आज्याला घाबरलेला पहिल्यांदाच बघितला.
"मला नाही माहित!", रोह्या खांदे पाडून आमच्याकडे बघत होता. तेवढ्यात कॉलेजचा शिपाई वर्गात आला,
"विक्रम कोण आहे इथे? प्रिंसिपल नी बोलावलय. लवकर चला!"

======================================================================================

आज जवळ जवळ एक वर्षानंतर पुन्हा ब्लॉग लिहितो आहे. आशा करतो हा भागही तुम्हाला आवडेल. हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा.
तुमच्या अभिप्रायाच्या प्रतिक्षेत,
-अद्वैत कुलकर्णी

6 comments:

 1. sir, tumhachi stories khup chhan ahe ani bakichya pan stories khup mast ahet pan ya story la jast vel lavat jau naka na please Khup vel lavata tumhi story post karayala, sorry pan vachalaya lavkar bhetali nahi tar kase tari vatate. Thanks Stories sathi

  ReplyDelete
  Replies
  1. hi! sorry! busy schedule मुळे जास्त वेळ मिळत नाही. पण तुमच्या कमेंट्स नक्कीच लिहिण्यासाठी उत्स्फुर्त करतात. पुढचा भाग प्रकाशित केला आहे. आपला अभिप्राय नक्की कळवा!

   Delete
 2. Sir next part kadhi publish karnar?? We are waiting eagerly

  ReplyDelete
  Replies
  1. Thank you your comment! पुढचा भाग प्रकाशित केला आहे. आपला अभिप्राय नक्की कळवा!

   Delete
 3. आजवर कधी कोणताही ब्लॉग वाचला नव्हता. कोणीतरी तुमचा ब्लॉग forward केला आणि त्यामुळे तुमच्या कथेचा फक्त ९वा भाग वाचला. खूप छान लिहिता.

  मी देखील अधून मधून लिहित असते. मिसळपाव नावाच्या site वर माझ लेखन टाकत असते. अभिप्राय बरे असतात. काही मित्र मैत्रिणीनी मी ब्लॉग लिहावा म्हणून आग्रह केला. म्हणून ब्लॉग्स म्हणजे नक्की काय असते हे शोधायला बसले आहे. पहिलाच ब्लॉग तुमचा वाचला आणि खूप आवडला.

  ReplyDelete
 4. नमस्कार ज्योतीजी,
  माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आपण इतरही ८ भाग क्रमाने वाचावेत ही विनंती. जेणेकरून ९व्या भागाचा संबंध आपण पुर्ण कथेशी जोडू शकाल.

  तुमचे लिखाण देखिल वाचण्यास नक्कीच आवडेल. शुभेच्छा!!

  ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...