Sunday, February 27, 2011

लेखमाला स्पर्धेला चांगला प्रतिसाद!

मी आधिच्या पोस्टमध्ये मराठी कॉर्नरच्या "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११" विषयी लिहिले होते. आणि आज आनंदाची बातमी अशी की ६ दिवसांत ९ लेख या स्पर्धेत सामिल झाले देखिल! मग तुमचा लेख पाठवताय ना? आहो वाट कशाची पाहताय? आजच तुमचा लेख http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36 येथे पोस्ट करा आणि काय माहित पहिल्या क्रमांकाचे बक्षिस तुम्हालाच मिळेल! आणि प्रत्येक सहभागी सभासदाला प्रशस्तिपत्रक तर आहेच! मग लवक आपला लेख पाठवा!

अद्वैत
marathi

Tuesday, February 22, 2011

मराठी कॉर्नर वरिल "लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११"

नमस्कार मित्रांनो! आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय! आपल्या लाडक्या मराठी कॉर्नरने एक लेखमाला स्पर्धा आयोजित केली आहे आणि विजेत्याला रुपये १००/- चे बक्षिसही ठेवले आहे! मग मिळवणारना बक्षिस??? हा हा!! अर हो! थांबा! सांगतो! सगळी माहिती व्यवस्थित सांगतो!


मराठी कॉर्नर नेमके आहे तरी काय?
थोडक्यात माहिती
१. साईटचं नाव: Marathi Corner a marathi forum| मराठी कॉर्नर एक मराठी फोरम
२. साईटचा उद्देश व कार्यपद्धती: एकदम सहज, साधी, सोपी आणि मुख्यतः मराठीसाठी काम करणारी अशी ही वेबसाईट आहे. केवळ मराठीसाठी म्हणून इतर भाषांचा अपमान करणे वा इतर भाषांचा तिरस्कार करणे या मताचे हे लोक नाहीत. हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश असा की आज मराठी ब्लॉगर "ब्लॉगिंग" या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत जे खरोखरच खुप चांगले आहे. त्यामुळे अशा सर्वांना कोठेतरी एकत्र आणणे गरजेचे आहे जेणे करून सर्व मराठी लोक एका छताखाली एकत्र येतील, एकत्र विचरांचे आदान-प्रदान करतील, त्यांची मते मांडतील, गप्पा गोष्टी करतील, २ क्षण आनंदात घालवतील. थोडक्यात इंग्रजीत म्हणायचे झालेच तर "virtual online gate to gather". इथे कोणत्याही प्रकारे राजकीय, जातीय वा अश्लील लेखनाला मात्र जागा मिळणार नाही.
  लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ नेमकी आहे तरी काय?
लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ ही स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. मराठी कॉर्नरच्या सभासदांच्या विचारांना चालना देण्यासाठी हा उपक्रम मराठी कॉर्नरने आखला आहे. या स्पर्धेचे नियम मराठी कॉर्नरवर www.marathicorner.com/viewtopic.php?f=36&t=284 येथे दिले आहेत ते मी जसेच्या तसे येथे पोस्ट करतो!

 लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११
लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ ही मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. आशा आहे या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळेल. या स्पर्धेत काही नियमही असतिल आणि हे नियम पाळणे सर्व सहभाग घेणार्‍या सभासदांना बंधनकारक असतिल.
या नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास तो सभासद स्पर्धेतून बाद होईल.
नियम

१.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी विषयाचे कोणतेही बंधन नाही.

२.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ साठी शब्दमर्यादा ही "एका पोस्ट मध्ये बसतील तितके शब्द" अशी असेल. एक पेक्षा जास्त पोस्ट टाकल्या तर तो लेख बाद घोषित केला जाईल. (एका पोस्टमध्य इंग्रजी ६०,००० characters बसतात. मराठी exact किती बसतील हे सांगू शकत नाही! :) )

३.प्रत्येक सभासदाला केवळ एकच लेख देता येईल. त्यामुळे तुमचा कोणताही सगळ्यात चांगला लेख या स्पर्धेत द्यावा.

४.लेख आधी प्रसिद्ध झालेला, किंवा छापलेला असला तरी चालेल पण तो तुमचा असणे गरजेचे आहे.

५.लेखात फोटो वगैरे चालेल फक्त लिंक देताना जर गरज असेल तरच द्यावी अन्यथा अशा लिंक्स "Spam" ठरवल्या जातिल!

६.लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११ मध्ये सहभागी होणारे लेख हे तुमचे स्वतःचे असावेत! संकलित/संग्रहित लेख किंवा चोरलेले असे लेख जर दिसून आले तर तो सभासद स्पर्धेतून बाद घोषित केला जाईल.

७.प्रत्येक सहभागी सभासदाने आपापला लेख "NEW TOPIC" म्हणून टाकावेत. दुसर्‍या सभासदांच्या लेखाला REPLY म्हणून टाकू नये!(थोडक्यात प्रत्येकाने सहभाग घेताना नवा धागा सुरू करावा. दुसर्‍याच्या धाग्यात मांडू नये!)

८.अश्लील विषय, पक्षीय राजकारण (घोटाळ्यांवर वगैरे चालेल पण एखाद्यावर उद्देशुन लेखन नको!), धार्मिक किंवा जातीय विषय (हे प्रकर्षाने टाळा!) ,प्रक्षुब्ध लिखाण, वैयक्तिक उणी दुणी काढणारे लिखाण, प्रचारात्मक लिखाण, तसेच बोचक टीका इ. गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात किंबहुना असे विषय इथे निषिद्ध आहेत.

९.परिक्षकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल आणि तो सर्वांनी खिलाडू वृत्तीने स्विकारावा ही अपेक्षा.(परिक्षकांची नावे आत्ता जाहिर केली जाणार नाहित!)

१०.संचालक मंडळातिल सदस्य या स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहित.

११.स्पर्धेचा कालावधी हा दिवसांवर नसेल तर कमित कमी १० लेख सहभागी झाले की त्या नंतर १० दिवस असा राहिल! (अजून अंदाज येत नसल्याने असा कालावधी ठेवला आहे! :D )

१२.http://www.marathicorner.com/viewforum.php?f=36 येथे पोस्ट केलेलेच लेख या स्पर्धेत ग्राह्य धरले जातिल!


बक्षिसे
१.विजेत्या सभासदाला रुपये १००/- चे बक्षिस देण्याचे योजले आहे. हि रक्कम मनी ऑर्डरने किंवा मोबाईल रिचार्ज या पद्धतिने दिली जाईल. मनी ऑर्डर करताना लागणारी फी बक्षिसाच्या रकमेतूनच घेतली जाईल तसेच जर मोबाईल रिचार्ज हा पर्याय निवडला तर जास्तीत जास्त १०० रुपयांचा रिचार्ज केला जाईल. त्यातून मिळणार्‍या टॉकटाईमच्या रकमेचा यात विचार होणार नाही याची नोंद घ्यावी.

२.सध्या केवळ "पहिला क्रमांक"च काढण्यात येईल.

३.सर्व सभासदांना आणि विजेत्याला "ई सर्टिफिकेट" देखिल मिळेल. ते त्यांना मेल केले जाईल.*या नियमांत कोणत्याही क्षणी बदल केला जाऊ शकतो याची सर्वांनी दखल घ्यावी.
आणि हो, तुम्ही मराठी कॉर्नरचे सभासद असणे तर आवश्यक आहेच! :D मग तुम्ही भाग घेणार ना? तुम्हाला काही शंका असतिल तर Comment टाका, मी आवश्य निर्सन करण्याचा प्रयत्न करेन!

आपला,
अद्वैत!
marathi

Saturday, February 5, 2011

भारत माझा देश आहे??


परवा मी ब~याच दिवसांनी माझ्या प्राथमिक शाळेसमोरुन जात होतो. ती छोटी-छोटी मुलं लगबगीने शाळेत पळत होती. सहज आत डोकावून पहिलं तर आमचे नकाते मास्तर "प्रतिद्न्या" म्हणण्यासाठी स्टेजवर उभे होते. नकळत माला माझे बालपण आठवले. त्यावेळीही नकाते मास्तरच प्रतिद्न्या घ्यायचे आणि उशिरा आल्याचा प्रसाद मी कधीच चुकवायचो नाही. :D. तेवढ्यात मास्तरांनी माला हाक मारली आणि मी जुन्या आठवणिंतुन बाहेर आलो. त्यांच्या चेह~यावर माला पाहिल्याचा आनंद साफ़ दिसत होता. मीही त्यांना पाहून खुप खुष होतो. त्यांनी स्टेजवरूनच माला थांबण्याची खुण केली आणि मीही मान डुलावली.

मास्तर त्यांच्या टिपिकल "टोनींग"मध्ये सुरु झाले; "भारत माझा.........देश आहेssss. सारे भारतिय......". आणि अचानकच माझे मन "भारत माझा देश आहे" याच वाक्याभोवती फ़िरू लगले ,का कोणास ठाऊक पण कधीही न पडलेला प्रश्न पडला , खरच भारत माझा देश आहे? माझा? आज ज्या देशाचे गुणगान मी गातो तो खरच "माझा" देश आहे? आज जिथे तिथे माझ्यासारखा सामान्यमाणूस मारला जातोय तो "माझा" देश आहे? आज जिथे शिक्षण हे गुणवत्तेवर नसुन जन्माला येणा~याच्या जातिवर अवलंबून आहे तो "माझा" देश आहे? आरे दादोजी कोंडदेव हे केवळ जातिने ब्राह्मण होते म्हणून शिवरायांचा इतिहासच जिथे बदलला जातो तो "माझा" देश आहे? कोणतेही सरकारी काम बिना त्रासाचे करायचे असेल तर खिसा "गरम" करावा लागतो तो "माझा" देश आहे? जाती आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेला हा "माझा" देश आहे? common manच जिथे uncommon झाला आहे असा हा "माझा" देश आहे? तेवढ्यात चिल्ल्या पिल्ल्यांच्या "जय हिंद! जय भारत!"च्या उत्सफ़ुर्त घोषणेने भानावर आलो. माला त्यांना सांगावस वाटत होतं की बाबांनो लाहानच राहा. जोपर्यंत आइ-बाबांच्या छायेत आहात तोपर्यंतच तुम्ही safe आहात. हा देश तुम्हाला जगु देणार नाही!

इतक्यात नकाते मास्तर जवळ आले आणि त्यांच्या त्या मायेच्या हातांनी माझ्या डोक्यावरून हात फ़िरवून म्हणाले, "बाळा, मघासपासून बघतोय तु कसला तरी विचार करतोयेस. काय झालय? काही आर्थिक मदत हवी आहे का?" मी म्हणालो "नाही मास्तर. तस काही नाही." तरिही ते ऐकेनात. मग मी शेवटी त्यांना माझ्या सगळ्या शंका विचारल्या. म्हणालो "खरच सांगा हा "माझा" देश आहे?" त्यांनी नेहमी प्रमाणे स्मित हास्य केलं आणि माला त्यांच्या office मधे घेऊन गेले.

माला बसायला सांगून त्यांच्या टिजोरीत काहीतरी शोधू लागले. तोपर्यंत मी इकडे तिकडे बघत जुन्या आठवणीत रमलो होतो. मी फोडलेली कपाटाची काच अजुन तशीच पाहून मीच थोडा शरमलो तेवढ्यात मास्तर म्हणाले,"साहेब! तुमचेच पराक्रम आहेत ते! जपून ठेवलेत हो मी" आणि त्यांनी एक धूळ खात पडलेली जूनी file झटकून माझ्या पुढ्यात ठेवली आणि माला बघायला सांगितली. मीही कुतुहलाने file उघडली. आत दोन पुणे युनिवर्सिटीची graduation certificates होती. "Mr. R. A. NAKATE,B.Sc. आणि LLB".

दोन मिनिट माला काहीच कळेना. मास्तर आणि "lawyer"?? माझा "बिघडलेला" चेहरा बघून मास्तर हसत म्हणाले, "२५ वर्षांपूर्वी मालाही हाच प्रश्न पडला होता की खरच भारत हा "माझा" देश आहे का? म्हणून मी त्याचा अभ्यास करायच ठरवलं आणि एक गोष्ट लक्षात आली की हे कही आता बदलणे शक्य नाही पण जर "बीज"च मजबूत रोवलं तर त्याचे फ़ळ नक्कीच गोड मिळेल. म्हणूनच मी हे law चे शिक्षण बाजूला ठेवून प्राथमिक शिक्षक बनलो. का तर बालवयातच मुलांना मानसिक द्रुष्ट्या मजबुत बनवायचे की जेणेकरून कळत्या वयात आल्यावर ते स्वत: या देशाला सुधरवण्यासाठी सक्षम होतील. तु जेव्हा माला विचारलस की "खरच हा देश माझा आहे का?" तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. माला कळून चुकलं की "बीज" अगदी perfect रुजु झालय. बाळा या देशाला अश्याच तरुण पिढिची गरज आहे जी स्वत:च्या डोक्याने विचार करेल. हा तुझाच देश आहे पण काही वाईट शक्ती त्याला तुझ्यापासून दूर नेत आहेत. कदाचित तुला हे पटणारही नाही पण या माझ्या डोळ्यांनी जग खुप जवळून पाहिले आहे रे! मी तुला असेही म्हणत नाहीये की माझ्यासारखे शिक्षण सोडून शिक्षक बन! काहीही बन पण तुझ्या क्षेत्रात मित्र-परिवारासोबत देशालाही प्राधन्य दे. एवढ मात्र सदैव लक्षात ठेव की "भारत हा तुझाच देश आहे..... तुझाच देश आहे"."

त्यांचे पाणावलेले डोळे नकळतच माला जिद्द देउन गेले एक धीर देउन गेले. त्या क्षणापासून मी माझ्या मनातून ती शंकाच काढून टाकलिये. मी अभिमानने म्हणतोय, होय मी भारतिय आहे; भारत माझा देश आहे!

 -अद्वैत
मराठी

Tuesday, February 1, 2011

ताई

नमस्कार !. मी expert कवी नाही पण जे मनातून येतं ते मी लिहितो. आज प्रथमच माझी लाडकी कविता प्रसिद्ध करत आहे. आशा हे तुम्हाला आवडेल.
ही कविता माझ्या लाडक्या ताईच्या लग्नावेळी मनातून आलेली कविता आहे, आजही ही कविता वाचताना कंठ दाटून येतो. तुम्हाला जर बहिण असेल तर नक्कीच ही कविता तुम्हाला आवडेल.

ताई
भातूकलीचा खेळ खेळता खेळता
आज अचानक संसाराच्या गोष्टी बोलू लागली ताई
म्हणे "संसाराचा सागर" मी पोहून जाईन आई.

या संसाराच्या सागराची व्याप्ती माला अजूनतरी कळली नाही,
पण आता ताई "दुसर्‍यांच्या" घरी जाणार हे मन काही केल्या मानत नाही!

मी आईला विचारले, "का ग चालली सासरी आपल्याला सोडून ताई?"
ती म्हणे "बेटा, कधीतरी उमलणारच ना रे जाई-जुई"

"मीच माझ्या बाबांची लाडकी" असं कोण चिडवणार माला आता?
"डोळ्यात तेवढी आसवं आणली" तिनं जाता जाता!

"आता मी एकटाच?" ही कल्पनाच रुचेना,
अन "ताई शिवाय" या कल्पनेने मनाला काही करमेना!

तरी मी केली मनाची तयारी,
ताईला "पाठवायची" तिच्या "त्या" घरी.

ती सुखी राहील याची खात्री "त्याने" दिली
कानपिळित "त्याच्या" कडून मी एवढीच गोष्ट मागितली!

तिचा तो स्वप्नांचा राजकुमार
बघता बघता तिला घेऊन गेला पाहा!
माला तरी आणखी काय हवय?
ताई दिल्या घरी तु सुखी राहा!
-अद्वैत कुलकर्णी

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...