Saturday, February 5, 2011

भारत माझा देश आहे??


परवा मी ब~याच दिवसांनी माझ्या प्राथमिक शाळेसमोरुन जात होतो. ती छोटी-छोटी मुलं लगबगीने शाळेत पळत होती. सहज आत डोकावून पहिलं तर आमचे नकाते मास्तर "प्रतिद्न्या" म्हणण्यासाठी स्टेजवर उभे होते. नकळत माला माझे बालपण आठवले. त्यावेळीही नकाते मास्तरच प्रतिद्न्या घ्यायचे आणि उशिरा आल्याचा प्रसाद मी कधीच चुकवायचो नाही. :D. तेवढ्यात मास्तरांनी माला हाक मारली आणि मी जुन्या आठवणिंतुन बाहेर आलो. त्यांच्या चेह~यावर माला पाहिल्याचा आनंद साफ़ दिसत होता. मीही त्यांना पाहून खुप खुष होतो. त्यांनी स्टेजवरूनच माला थांबण्याची खुण केली आणि मीही मान डुलावली.

मास्तर त्यांच्या टिपिकल "टोनींग"मध्ये सुरु झाले; "भारत माझा.........देश आहेssss. सारे भारतिय......". आणि अचानकच माझे मन "भारत माझा देश आहे" याच वाक्याभोवती फ़िरू लगले ,का कोणास ठाऊक पण कधीही न पडलेला प्रश्न पडला , खरच भारत माझा देश आहे? माझा? आज ज्या देशाचे गुणगान मी गातो तो खरच "माझा" देश आहे? आज जिथे तिथे माझ्यासारखा सामान्यमाणूस मारला जातोय तो "माझा" देश आहे? आज जिथे शिक्षण हे गुणवत्तेवर नसुन जन्माला येणा~याच्या जातिवर अवलंबून आहे तो "माझा" देश आहे? आरे दादोजी कोंडदेव हे केवळ जातिने ब्राह्मण होते म्हणून शिवरायांचा इतिहासच जिथे बदलला जातो तो "माझा" देश आहे? कोणतेही सरकारी काम बिना त्रासाचे करायचे असेल तर खिसा "गरम" करावा लागतो तो "माझा" देश आहे? जाती आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेला हा "माझा" देश आहे? common manच जिथे uncommon झाला आहे असा हा "माझा" देश आहे? तेवढ्यात चिल्ल्या पिल्ल्यांच्या "जय हिंद! जय भारत!"च्या उत्सफ़ुर्त घोषणेने भानावर आलो. माला त्यांना सांगावस वाटत होतं की बाबांनो लाहानच राहा. जोपर्यंत आइ-बाबांच्या छायेत आहात तोपर्यंतच तुम्ही safe आहात. हा देश तुम्हाला जगु देणार नाही!

इतक्यात नकाते मास्तर जवळ आले आणि त्यांच्या त्या मायेच्या हातांनी माझ्या डोक्यावरून हात फ़िरवून म्हणाले, "बाळा, मघासपासून बघतोय तु कसला तरी विचार करतोयेस. काय झालय? काही आर्थिक मदत हवी आहे का?" मी म्हणालो "नाही मास्तर. तस काही नाही." तरिही ते ऐकेनात. मग मी शेवटी त्यांना माझ्या सगळ्या शंका विचारल्या. म्हणालो "खरच सांगा हा "माझा" देश आहे?" त्यांनी नेहमी प्रमाणे स्मित हास्य केलं आणि माला त्यांच्या office मधे घेऊन गेले.

माला बसायला सांगून त्यांच्या टिजोरीत काहीतरी शोधू लागले. तोपर्यंत मी इकडे तिकडे बघत जुन्या आठवणीत रमलो होतो. मी फोडलेली कपाटाची काच अजुन तशीच पाहून मीच थोडा शरमलो तेवढ्यात मास्तर म्हणाले,"साहेब! तुमचेच पराक्रम आहेत ते! जपून ठेवलेत हो मी" आणि त्यांनी एक धूळ खात पडलेली जूनी file झटकून माझ्या पुढ्यात ठेवली आणि माला बघायला सांगितली. मीही कुतुहलाने file उघडली. आत दोन पुणे युनिवर्सिटीची graduation certificates होती. "Mr. R. A. NAKATE,B.Sc. आणि LLB".

दोन मिनिट माला काहीच कळेना. मास्तर आणि "lawyer"?? माझा "बिघडलेला" चेहरा बघून मास्तर हसत म्हणाले, "२५ वर्षांपूर्वी मालाही हाच प्रश्न पडला होता की खरच भारत हा "माझा" देश आहे का? म्हणून मी त्याचा अभ्यास करायच ठरवलं आणि एक गोष्ट लक्षात आली की हे कही आता बदलणे शक्य नाही पण जर "बीज"च मजबूत रोवलं तर त्याचे फ़ळ नक्कीच गोड मिळेल. म्हणूनच मी हे law चे शिक्षण बाजूला ठेवून प्राथमिक शिक्षक बनलो. का तर बालवयातच मुलांना मानसिक द्रुष्ट्या मजबुत बनवायचे की जेणेकरून कळत्या वयात आल्यावर ते स्वत: या देशाला सुधरवण्यासाठी सक्षम होतील. तु जेव्हा माला विचारलस की "खरच हा देश माझा आहे का?" तेव्हा माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. माला कळून चुकलं की "बीज" अगदी perfect रुजु झालय. बाळा या देशाला अश्याच तरुण पिढिची गरज आहे जी स्वत:च्या डोक्याने विचार करेल. हा तुझाच देश आहे पण काही वाईट शक्ती त्याला तुझ्यापासून दूर नेत आहेत. कदाचित तुला हे पटणारही नाही पण या माझ्या डोळ्यांनी जग खुप जवळून पाहिले आहे रे! मी तुला असेही म्हणत नाहीये की माझ्यासारखे शिक्षण सोडून शिक्षक बन! काहीही बन पण तुझ्या क्षेत्रात मित्र-परिवारासोबत देशालाही प्राधन्य दे. एवढ मात्र सदैव लक्षात ठेव की "भारत हा तुझाच देश आहे..... तुझाच देश आहे"."

त्यांचे पाणावलेले डोळे नकळतच माला जिद्द देउन गेले एक धीर देउन गेले. त्या क्षणापासून मी माझ्या मनातून ती शंकाच काढून टाकलिये. मी अभिमानने म्हणतोय, होय मी भारतिय आहे; भारत माझा देश आहे!

 -अद्वैत
मराठी

1 comment:

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...