नमस्कार,
शीर्षक वाचून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल! नसेल आलं तरी काही प्रॉब्लेम
नाही कारण आम्ही त्यासाठीच हा मेल पाठवत आहोत!
तर बातमी अशी आहे की आजपासून मराठी कॉर्नर "twitter" वर दाखल झाले आहे. आजच
आम्हाला Follow करा!
https://twitter.com/marathicorner
यात आणखी "लय भारी" सोय अशी आहे की आता मराठी कॉर्नरवर पोस्ट होणार्या
प्रत्येक पोस्टस या ट्विटरवर आपोआप "ट्विट" केल्या जाणार आहेत! त्यामुळे
तुम्ही पोस्ट केलेले मराठी कॉर्नरवरिल तुमचे विचार आता जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचवण्याची सोय सुरु झाली आहे! आम्हाला आशा आहे आमच्या
सभासदांना ही सुविधा जरूर आवडेल!
मध्यंतरी घेतलेल्या Feedbackला देखिल सुंदर प्रतिसाद मिळत आहे. त्यात एक गोष्ट
प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बर्याच सभासदांना मराठी कॉर्नर "क्लिष्ट" वाटत
आहे. पण तसे मुळीच नाही. तसे वाटण्याचे मुळ कारण असे की आजवर बर्याच
सभासदांनी अशा प्रकारचे संकेतस्थळ कधी वापरलेलेच नाही! आज महाजालावर ज्याकाही
मराठी साईट्स आहेत त्या बहुतकरून एकाच प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यामुळे त्या
वापरताना काहीच आडचणी भासत नाहीत. पण मराठी कॉर्नर या सगळ्यांहून हटके आहे! :)
आम्ही तुम्हाला एकच सल्ला देऊ ईच्छितो की मराठी कॉर्नरवर तुम्ही तुमच्याकडचा
थोडावेळ घालवा. तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या सोयी जाणून घ्या जसे की "तुमची
वेबसाईट प्रसिद्ध करण्य़ाची सोय" जी तुमच्या "User control Panel" मध्ये आहे!
ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉग, वेबसाईटला बॅकलिंक देऊ शकता. अशा अनेक
सुविधा सध्या उपलब्ध आहेत. गेल्या अपडेट मध्ये आम्ही "पाहुण्यांना" असलेली
काही विशिष्ठ फोरमच बघण्याची आडकाठी देखिल काढून टाकली आहे. लवकरच
"टेक्नॉलॉजी" आणि "फॉरवर्ड मेल" असे नवे विभाग सुरू करित आहोत. आशा आहे लवकरच
तुम्हाला आम्ही मराठी कॉर्नरवर सक्रिय पाहू.
काही आणखी आडचणी ज्या तुम्हाला जाणवतात आणि त्यांचे उत्तर!
१.मराठी कॉर्नर लोड व्हायला खुप वेळ लागतो? किंवा ब्राऊजर हॅंग होतो?
हा प्रॉब्लेम एकतर तुमच्याकडील नेट कनेक्शन स्पीड असेल किंवा न साफ केलेली
Cache memory असेल. गुगलवर cache memory कशी साफ करायची याची सर्व माहिती
मिळेल.
२.सतत लॉगइन करावे लागते?
याला उत्तर खुप सोपे आहे. तुम्ही जेव्हा लॉगइन करता तेव्हा तुम्हाला आम्ही २
ठिकाणं दिली आहेत. एक लोगोच्या खाली आणि दुसरी उजव्या बाजूला मध्यावर. तर
उजव्या बाजूला जो पर्याय आहे तो "क्विक लॉगइन" चा आहे. जर तुम्हाला एकदाच
लॉगईन करून ठेवायचे असेल तर लोगो च्या खालील "सदस्य प्रवेश"वर क्लिक करा. आता
तेथे तुमचा युजरनेम आणि पासवर्ड लिहिल्यानंतर खाली जे दोन बॉक्स आहेत त्यातिल
"Log me on automatically each visit" वर किलक करून त्या बॉक्समध्ये हिरवी
फुली आहे याची खात्री करा आणि मग प्रवेश घ्या. यामुळे तुम्हाला वारंवार प्रवेश
घ्यावा लागणार नाही.
३.मिनी-चॅट चा उपयोग काय?
ही एक मजा म्हणून दिलेली सोय आहे.ज्याचा वापर एकाचवेळी मराठी कॉर्नरवर प्रवेश
घेतलेल्या सभासदांना एकमेकांशी हितगुज साधता यावा यासाठी करावा.
४.मराठी कॉर्नरचा तुमच्या ब्लॉग अपडेटशी काहिही डायरेक्ट संबंध नाही!
बर्याच सभासदांना मराठी कॉर्नर हे "ब्लॉगसूची" वाटत आहे. तसे नाहिये! मराठी
कॉर्नरचा आणि तुमच्या स्वतःच्या ब्लॉग अपडेट करण्याचा काही संबंध नाही.
"सभासदांचे ब्लॉग" ही सुविधा तुमच्या ब्लॉगसाठी आहे. पण ती मराठी कॉर्नरची
Addon सुविधा आहे. मराठी कॉर्नरचा मुळ उद्देश "चर्चामंच" आहे! येथे विविध
विषयांचे विभाग आहेत ज्यावर त्या त्या विषयांवर चर्चा होणे आपेक्षित आहे. जसे
की "चालू घडामोडी" ज्यात सध्या सुरू असलेल्या एकना अनेक विषयांवर मौल्यवान
चर्चा होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही तुमच्याकडिल माहितीची देवाण-घेवाण करू शकता.
त्यामुळे तुम्ही तुमचा ब्लॉग अपडेट केला की तुम्ही मराठी कॉर्नरवर तुम्ही
सक्रिय होता हे चुकिचे आहे. मराठी कॉर्नरवर सक्रिय होणे म्हणजे मराठी कॉर्नरवर
प्रवेश घेणे आणि विविध विषयांवर चर्चा करणे ज्यात गप्पा-टप्पा, टाईमपास गेम्स,
गंभिर गोष्टी इत्यादी सर्व आपेक्षित आहे.
हे काही प्रश्न आहेत जे अत्तापर्यंत feedback मध्ये मांडले गेले. पण तुम्हाला
याहीपेक्षा काही वेगळा प्रॉब्लेम असेल तर नक्की आम्हाला या मेलला रेप्लाय करून
कळवा. आपल्या प्रत्येक शंकेचे, अडचणीचे निर्सन करण्याचा आम्ही पुर्ण प्रयत्न
करू!
मग मराठी कॉर्नरवर सक्रिय होताय ना? तुमची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय! आजच
थोडा वेळ काढा आणि मराठी कॉर्नर नेमके कसे आहे हे जाणून घ्या! सोबत काही
महत्वाच्या सोशल नेटवर्कवर आमच्या असलेल्या सहभागच्या लिंक देत आहे. आम्हाला
आजच Follow, Like करा आणि मराठी कॉर्नरचा परिवार आणखी मजबुत आणि विस्तारित
करण्यास आमची मदत करा!
मराठी कॉर्नर ट्विटरवर:https://twitter.com/marathicorner
मराठी कॉर्नर फेसबुकवर:http://www.facebook.com/pages/marathicornercom-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/170314392980409
मराठी कॉर्नर बझवर:https://mail.google.com/mail/#buzz/103022840241408656639
Wednesday, April 27, 2011
ट्विट ट्विट!!!
Tuesday, April 26, 2011
यन्ना रा**ल्ला! माईंड इट!
नमस्कार,
हे शीर्षक वाचलं की नकळतच (तुम्ही मनाशी ठरवा अथवा नको) पण "रजनिकांत" डोळ्यासमोर येतोच! हो! हो! तोच रजनिकांत ज्यांच्यावरच्या भन्नाट जोक्सनी आज संपुर्ण नेट झपाटून टाकलय! संता-बंतांवरिल होणारे अतिरेक, CID च्या पकाऊ शायरी, इतरत्र उगाचच ओढून ताणून केलेले जोक्स, याला खरोखरच कोणीतरी कॉंपिटिशन द्यायला यायलाच हवे होते आणि तेव्हाच "रजनिकांत" धावून आला!
त्यांचे सिनेमे पाहताना त्यनी हवेतल्या हवेत केलेले कारनामे, एका गोळीत दोन गुंडांचा केलेला खात्मा, वगैरे वगैरे जर न्यूटन, आईंस्टाईन, वगैरे "डोकेबाज" मंडळींनी पाहिले असते तर खरच सांगतो, "न्यूटनने आत्महत्या केली असती हो!" म्हणाला असता " रजनिकांत हवेत राहू शकतो म्हणजे नक्कीच गुरुत्वाकर्षण वगैरे काहीही नाही!अरे ते सफरचंद खाली पडलं हा अपवाद होता." :D
असो, पण वयाच्या 6० ला असूनही ROBOT सारखे जबरदस्त अॅक्शनपट करणे ही काही खाऊची गोष्ट नाही. कित्येकांनी त्यांच्यासारख्या करामती आपापल्या चित्रपटांत आजमावून पाहिल्या आजचे सुपरस्टार Big B देखिल कित्येक सिनेमांत असे काही करताना दिसले पण रजनी ते रजनीच! कितिही पानचट करामती असोत, त्या फक्ता त्यांनाच शोभतात!
त्यांच्यावर होणारे विनोद पाहता एखादा वैतागून अज्ञातवासात गेला असता पण हा व्हिडिओ पाहा. इतक्या मोठ्या सुपरस्टारची विनोदबुद्धी देखिल किती अफलातून आहे!
सध्या आम्ही मराठी कॉर्नर (http://www.marathicorner.com/) वर रजनिकांतचे अफलातून विनोद एकत्र करण्याचा प्रयत्न करित आहोत. त्यासाठी एक स्वतंत्र "रजनिकांत mania" (http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=11&t=66) नावाचा धागाही सुरू केला आहे. आत्तापर्यंत त्याला मराठी कॉर्नरच्या सभासदांकडून भरगोस प्रतिसाद देखिल मिळत आहे. एकवेळ आवश्य तेथे पोस्ट केलेले विनोद वाचा. हसून हसून लोळाल! :D आणि तुमच्याकडे देखिल जर काही नवे, तेथे पोस्ट नकेलेले असे विनोद असतिल तर बिनधास्त शेअर करा! जेणेकरून "रजनिकांत मराठी विनोद डाटाबेस"च जणू तयार होईल! :D
या लेखाचा शेवट करावाच लागेल. कारण लिहित गेलो तर रजनिकांत देखिल अपुरा पडेल. ( "रजनिकांत देखिल अपुरा पडेल" असे लिहिण्याचे कारण असे की सध्या पृथ्वीला रजनिकांतचे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि तो बहुतेक मान्यही होईल कारण रजनिकांतने होकार दिला आहे. :D आणि म्हणूनच २२ एप्रिलला पृथ्वीची आठवण ठेवण्यासाठी "Earth Day" सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. :D)
असो, शेवट माझ्या अत्तापर्यंतच्या लाडक्या रजनिकांत जोकने करतो:
मराठी कॉर्नरवर तुमच्याकडच्या "रजनिकांत" जोक्स पोस्ट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सहसा मराठीतच जोक्स लिहिता आले तर बघा! मराठी कॉर्नरवर डायरेक्ट कोणत्याही बाहेरच्या सॉफ्ट्वेअर किंवा संकेतस्थळाची मदत न घेता लिहिण्याची सोय देखिल आहे. (या सुविधेच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा. )
-अद्वैत!
मराठी कॉर्नर टिम

"एकदा रजनिकांतला खुप राग आला, त्या रागाच्याभरातच त्याने आपल्या नोकराला एवढ्या जोरात लाथ मारली की बिचारा हातातल्या झाडूसकट हवेत भिरकावला गेला......
.
.
.
.
.
.
.
.
आणि दुसर्या दिवशीपासून तो "हॅरी पॉटर"च्या नावाने जगभर प्रसिद्ध झाला! "
:D :D
मराठी कॉर्नरवर तुमच्याकडच्या "रजनिकांत" जोक्स पोस्ट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सहसा मराठीतच जोक्स लिहिता आले तर बघा! मराठी कॉर्नरवर डायरेक्ट कोणत्याही बाहेरच्या सॉफ्ट्वेअर किंवा संकेतस्थळाची मदत न घेता लिहिण्याची सोय देखिल आहे. (या सुविधेच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा. )
-अद्वैत!
मराठी कॉर्नर टिम
Labels:
jokes,
marathi,
rajani,
rajanikant,
rajanikanth,
मराठी,
रजनिकांत,
विनोद
Monday, April 25, 2011
आम्हाला तुमचा Feedback हवा आहे
नमस्कार,
आज बरेच दिवस झाले आपण मराठी कॉर्नरवर active दिसला नाहीत! त्यामुळे आम्हाला आपले मत/ feedback जाणून घ्यायचा आहे. गेल्या महिन्यात अचानकच मराठी कॉर्नर थंड पडलेले दिसून आले. जे सतत active असायचे ते देखिल शांत दिसत आहेत! त्यामुळे आम्हाला आपले मत जाणून घ्यायचे आहे. आम्ही सभासदांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न केला आहे तरिही अशी शांतता ? "ये बात कुछ हजम नही होती यार!" त्यामुळे आम्हाला तुमचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. कदाचित सभासदांना काही problems येत असतिल, किंवा तुम्हाला काही नवे सुचवायचे असेल तर बिनधास्त येथे "Feedback" या topicवर आपले मत मोकळेपणाने मांडावे.
तुम्हाला जर काही अडचणी येत असतिल, तुमची प्रोफाईल हाताळताना काही गैरसोयी होत असतिल किंवा याहूनही काही वेगळे problems येत असतिल तर नक्की आम्हाला कळवा! तसेच आमचे सर्व मेल तुम्हाला मिळतात ना? हे देखिल जाणून घ्यायचे आहे. सतत तुम्ही तुमच्या मेलचे "Spam" किंवा "Junk" हे फोल्डर तपासत जा! कारण कधी कधी आमच्याकडून आलेले मेल तेथेही जाऊ शकतात!
आपले मत/Feedback जाणून घेण्यास आम्हाला निश्चितच आवडेल आणि आमचे काही चुकत असेल किंवा आणखी काय सुविधा आमच्या सभासदांना हव्या आहेत हे देखिल जाणून घेण्यास आवडेल!
आपल्या feedbackच्या प्रतिक्षेत!
-marathi corner team

Tuesday, April 12, 2011
Sunday, April 10, 2011
आता मराठी लिहा डायरेक्ट!
नमस्कार मंडळी,
मागिल पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, मराठी कॉर्नरच्या सभासदांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी मराठी कॉर्नर टिम नेहमीच प्रयत्न करित असते!
गेल्या बर्याच दिवसांपासून मराठी कॉर्नरच्या सभासदांना मराठी डायरेक्ट लिहिता यावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करित होतो आणि आज या प्रयत्नांना यश मिळाले आहे! मराठी लेखनासाठी एकमेव पर्याय असलेल्या "बराहा"नेही आता सामान्यांना न परवडेल अशी किंमत त्यांच्या सॉफ्टवेअरला लावली आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठी कॉर्नरवर मराठी लिखाणाची गैरसोय जाणवू लागली होती! पण आता नाही! :-) कारण आजपासून तुम्ही मराठी कॉर्नरवर कधिही, कोठूनही मराठी लिहू शकता आणि तेही "कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअर" शिवाय!
मग आहे की नाही भारी सोय??? मग करताय ना मराठी कॉर्नरवर लिखाणाला सुरूवात? होताय ना मराठी कॉर्नरवर active? एकवेळ ही सुविधा वापरून पाहाच आणि कोणताही प्रॉब्लेम आलाच तर लगेचच या मेलला रिप्लाय द्या. तसेच डायरेक्ट मराठी लिखाणाची सुविधा चालू किंवा बंदही करता येते. डाव्याबाजूला असलेल्या स्थिर "मराठी लिखाण" या चेकबॉक्सवर टिचकी मारून डायरेक्ट मराठी लिखाणाची सोय चालू किंवा बंद करता येते. ही सुविधा वापरताना काही अडचणी किंवा तुम्हाला यात आणखी काही नविन सुचवायचे असल्यास आम्हाला जरूर मेल करून कळवा! आपल्या सर्व सुचनांचे मराठी कॉर्नर टिम सदैव स्वागतच करेल!
तसेच आजपासूनच "झटक्यात रिप्लाय" ही सुविधा देखिल सादर करित आहोत. या सुविधेमुळे तुम्हाला जर कोणत्याही लेखाला रिप्लाय द्यायचा असेल तर त्या लेखाच्या खालीच रिप्लायचा बॉक्स असेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेलच शिवाय रिप्लाय देणे आता जास्त सोप्पे जाईल!
ट्विटर,बझ,ब्लॉग,फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कस द्वारे या सुविधेची तुमच्या मित्रमंडळींना माहिती देऊन मराठी कॉर्नरच्या प्रसार व प्रचारात जर आपण काही मदत करू शकलात तर निःश्चितच आम्ही आपले ऋणी राहू. कारण सभासदांचा सपोर्ट नक्कीच आम्हाला नवा जोष, नवी ताकद देऊ शकतो. जेणे करून आणखी मस्त मस्त सुविधा आम्ही मराठी कॉर्नरच्या सभासदांना देऊ शकू.
सदैव आपल्या सेवेत!

Monday, April 4, 2011
तुमचा ब्लॉग जोडा मराठी कॉर्नरच्या नव्या सुचीत!
गेल्या ५ महिन्यांत २०० हुन अधिक सभासद, ३५० हुन अधिक मांडले गेलेले विषय आणि ५०० हुन अधिक लिहिल्या गेलेल्या पोस्टस. तसेच "दै.सकाळ" कडून झालेले जाहिर कौतुक यावरूनच मराठी कॉर्नरची लोकप्रियता लक्षात येते.
आपल्या सभासदांना जास्तित जास्त लाभ मिळावा यासाठी सदैव प्रयत्न करणारी मराठी कॉर्नर टिम आज चैत्रपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आणखी एक अभिमानास्पद सुविधा घेऊन आली आहे. "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा"ला मिळालाय एक नवा लुक!!
तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा ही मराठी कॉर्नरने सुरू केलेली ब्लॉगसूची होती. पहिल्यांदा जेव्हा ही सूची सुरू केली होती तेव्हा फक्त ब्लॉगस जोडले गेलेले होते. तेव्हा सभासदांनी लिहिलेल्या ताज्या पोस्टस मराठी कॉर्नरच्या सूचीत येत नसत पण आता तेही सुरू झाले आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून या सुविधेची वारंवार परिक्षा घेण्यात आली आणि आता ही सुविधा पुर्णपणे व्यवस्थित सुरू आहे.
आता मराठी कॉर्नरशी जोडल्या नंतर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहिलेल्या नव्या पोस्टस तुमच्या नावानिशी http://www.marathicorner.com/memberblogs/ येथे अपडेट होतील आणि त्याही काही मिनिटांत. आणि हो, तुम्ही लिहिलेल्या पोस्टचे सगळे क्रेडिट तुम्हाला मिळावे म्हणून आम्ही तुमच्या पोस्टचे मुळ दुवे देखिल त्या पोस्टच्या शिर्षकाला जोडतो आहोत. म्हणजे, जर कोणी मराठी कॉर्नरच्या सूचीतून तुमच्या ब्लॉगच्या पोस्टवर क्लिक केले की त्याला तुमच्या ब्लॉगवर आपोआप नेले जाईल!
मग आहे की नाही मस्त सुविधा?? आजच या सुविधेचा लाभ घ्या. तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडण्यासाठी
http://www.marathicorner.com/memberblogs/attach-your-blog हा फॉर्म भरणे व तेथे दिलेल्या सुचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल. आणि जर तुम्ही आधीच मराठी कॉर्नशी आपला ब्लॉग जोडला असेल तर आपला ब्लॉग मराठी कॉर्नरच्या जोडले गेलेले ब्लॉग मध्ये आहे याची खात्री करून घ्या. त्यासाठी येथे जावा : http://marathicorner.com/memberblogs/jodalegeleleblog/ यात जर आपला ब्लॉग दिसत असेल तर आपला ब्लॉग आमच्या सूचीत व्यवस्थित जोडला गेला आहे असे समजावे पण जर यात आपला ब्लॉग नसेल तर लगेच मराठी कॉर्नरशी संपर्क साधा http://www.marathicorner.com/contact.php
आजवर ४६ ब्लॉग जोडले गेले आहेत. आशा आहे लवकरच आपलाही ब्लॉग या यादित दिसू लागेल! :D

Subscribe to:
Posts (Atom)