Tuesday, April 26, 2011

यन्ना रा**ल्ला! माईंड इट!

नमस्कार,

हे शीर्षक वाचलं की नकळतच (तुम्ही मनाशी ठरवा अथवा नको) पण "रजनिकांत" डोळ्यासमोर येतोच! हो! हो! तोच रजनिकांत ज्यांच्यावरच्या भन्नाट जोक्सनी आज संपुर्ण नेट झपाटून टाकलय! संता-बंतांवरिल होणारे अतिरेक, CID च्या पकाऊ शायरी, इतरत्र उगाचच ओढून ताणून केलेले जोक्स, याला खरोखरच कोणीतरी कॉंपिटिशन द्यायला यायलाच हवे होते आणि तेव्हाच "रजनिकांत" धावून आला!

त्यांचे सिनेमे पाहताना त्यनी हवेतल्या हवेत केलेले कारनामे, एका गोळीत दोन गुंडांचा केलेला खात्मा, वगैरे वगैरे जर न्यूटन, आईंस्टाईन, वगैरे "डोकेबाज" मंडळींनी पाहिले असते तर खरच सांगतो, "न्यूटनने आत्महत्या केली असती हो!" म्हणाला असता " रजनिकांत हवेत राहू शकतो म्हणजे नक्कीच गुरुत्वाकर्षण वगैरे काहीही नाही!अरे ते सफरचंद खाली पडलं हा अपवाद होता."  :D

असो, पण वयाच्या 6० ला असूनही ROBOT सारखे जबरदस्त अ‍ॅक्शनपट करणे ही काही खाऊची गोष्ट नाही. कित्येकांनी त्यांच्यासारख्या करामती आपापल्या चित्रपटांत आजमावून पाहिल्या आजचे सुपरस्टार Big B देखिल कित्येक सिनेमांत असे काही करताना दिसले पण रजनी ते रजनीच! कितिही पानचट करामती असोत, त्या फक्ता त्यांनाच शोभतात!

त्यांच्यावर होणारे विनोद पाहता एखादा वैतागून अज्ञातवासात गेला असता पण हा व्हिडिओ पाहा. इतक्या मोठ्या सुपरस्टारची विनोदबुद्धी देखिल किती अफलातून आहे!


सध्या आम्ही मराठी कॉर्नर (http://www.marathicorner.com/) वर रजनिकांतचे अफलातून विनोद एकत्र करण्याचा प्रयत्न करित आहोत. त्यासाठी एक स्वतंत्र "रजनिकांत mania" (http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=11&t=66) नावाचा  धागाही सुरू केला आहे. आत्तापर्यंत त्याला मराठी कॉर्नरच्या सभासदांकडून भरगोस प्रतिसाद देखिल मिळत आहे. एकवेळ आवश्य तेथे पोस्ट केलेले विनोद वाचा. हसून हसून लोळाल! :D आणि तुमच्याकडे देखिल जर काही नवे, तेथे पोस्ट नकेलेले असे विनोद असतिल तर बिनधास्त शेअर करा! जेणेकरून "रजनिकांत मराठी विनोद डाटाबेस"च जणू तयार होईल! :D

या लेखाचा शेवट करावाच लागेल. कारण लिहित गेलो तर रजनिकांत देखिल अपुरा पडेल. ( "रजनिकांत देखिल अपुरा पडेल" असे लिहिण्याचे कारण असे की सध्या पृथ्वीला रजनिकांतचे नामकरण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे आणि तो बहुतेक मान्यही होईल कारण रजनिकांतने होकार दिला आहे. :D आणि म्हणूनच २२ एप्रिलला पृथ्वीची आठवण ठेवण्यासाठी "Earth Day" सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. :D)

असो, शेवट माझ्या अत्तापर्यंतच्या लाडक्या रजनिकांत जोकने करतो:

"एकदा रजनिकांतला खुप राग आला, त्या रागाच्याभरातच त्याने आपल्या नोकराला एवढ्या जोरात लाथ मारली की बिचारा हातातल्या झाडूसकट हवेत भिरकावला गेला......
.
.
.
.
.
.

.
.
आणि दुसर्‍या दिवशीपासून तो "हॅरी पॉटर"च्या नावाने जगभर प्रसिद्ध झाला! " 
:D  :D 

मराठी कॉर्नरवर तुमच्याकडच्या "रजनिकांत" जोक्स पोस्ट करायला अजिबात विसरू नका. आणि हो, सहसा मराठीतच जोक्स लिहिता आले तर बघा! मराठी कॉर्नरवर डायरेक्ट कोणत्याही बाहेरच्या सॉफ्ट्वेअर किंवा संकेतस्थळाची मदत न घेता लिहिण्याची सोय देखिल आहे. (या सुविधेच्या आधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा. )

-अद्वैत!
मराठी कॉर्नर टिम

No comments:

Post a Comment

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...