Sunday, April 10, 2011

आता मराठी लिहा डायरेक्ट!

नमस्कार मंडळी,
मागिल पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे,  मराठी कॉर्नरच्या सभासदांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी मराठी कॉर्नर टिम नेहमीच प्रयत्न करित असते!
गेल्या बर्‍याच दिवसांपासून मराठी कॉर्नरच्या सभासदांना मराठी डायरेक्ट लिहिता यावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करित होतो आणि आज या प्रयत्नांना यश मिळाले आहे! मराठी लेखनासाठी एकमेव पर्याय असलेल्या "बराहा"नेही आता सामान्यांना न परवडेल अशी किंमत त्यांच्या सॉफ्टवेअरला लावली आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठी कॉर्नरवर मराठी लिखाणाची गैरसोय जाणवू लागली होती! पण आता नाही! :-) कारण आजपासून तुम्ही मराठी कॉर्नरवर कधिही, कोठूनही मराठी लिहू शकता आणि तेही "कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअर" शिवाय!

मग आहे की नाही भारी सोय??? मग करताय ना मराठी कॉर्नरवर लिखाणाला सुरूवात? होताय ना मराठी कॉर्नरवर active? एकवेळ ही सुविधा वापरून पाहाच आणि कोणताही प्रॉब्लेम आलाच तर लगेचच या मेलला रिप्लाय द्या. तसेच डायरेक्ट मराठी लिखाणाची सुविधा चालू किंवा बंदही करता येते. डाव्याबाजूला असलेल्या स्थिर "मराठी लिखाण" या चेकबॉक्सवर टिचकी मारून डायरेक्ट मराठी लिखाणाची सोय चालू किंवा बंद करता येते. ही सुविधा वापरताना काही अडचणी किंवा तुम्हाला यात आणखी काही नविन सुचवायचे असल्यास आम्हाला जरूर मेल करून कळवा! आपल्या सर्व सुचनांचे मराठी कॉर्नर टिम सदैव स्वागतच करेल!

तसेच आजपासूनच "झटक्यात रिप्लाय" ही सुविधा देखिल सादर करित आहोत. या सुविधेमुळे तुम्हाला जर कोणत्याही लेखाला रिप्लाय द्यायचा असेल तर त्या लेखाच्या खालीच रिप्लायचा बॉक्स असेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेलच शिवाय रिप्लाय देणे आता जास्त सोप्पे जाईल!

ट्विटर,बझ,ब्लॉग,फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कस द्वारे या सुविधेची तुमच्या मित्रमंडळींना माहिती देऊन मराठी कॉर्नरच्या प्रसार व प्रचारात जर आपण काही मदत करू शकलात तर निःश्चितच आम्ही आपले ऋणी राहू. कारण सभासदांचा सपोर्ट नक्कीच आम्हाला नवा जोष, नवी ताकद देऊ शकतो. जेणे करून आणखी मस्त मस्त सुविधा आम्ही मराठी कॉर्नरच्या सभासदांना देऊ शकू.

सदैव आपल्या सेवेत!

मराठी कॉर्नर टिम

2 comments:

  1. मराठी लिहिण्याकरता बरहापेक्षा युनिकोड जास्त उपयुक्त टरेल असे मला वाटते

    ReplyDelete
  2. @sharayu
    बराहा देखिल युनिकोडच आहे. पण हा लेख आहे "मराठी कॉर्नर" (http://www.marathicorner.com/) वरिल डायरेक्ट मराठी लिहिण्याच्या सोयीवर आधारित. तेथे मराठीत लिहिण्यास आजपासून कोनतेही बाह्य सॉफ्टवेअरची गरज भासणार नाही. "डायरेक्ट" मराठीत लिहिता येईल! :)

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...