Saturday, January 22, 2011

तुझी सोबत

प्रेम सर्वांनी करावे पण जेव्हा दोन्ही लोक एकमेकांवर जिवापाड प्रेम करत असतील तरच! आजवर "एखादी"मुळे रामायणे/महाभारते घडली अन अजूनही घडतच आहेत! कारण केवळ "त्या"चे आणि "ती"चे एकत्र येणे!! पण कधी कधी "ती"च अर्धवट डाव सोडून जाते मग मात्र "तो" हतबल असतो!

----------तुझी सोबत---------
तुझ्यामाझ्या मिलनात अनेक संकटे होती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

क्षणात जगाचा विरोध घेतला हाती,
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

भेदली सर्व संकटे तोडली सर्व नाती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

अखंड चालत राहिलो लढलो एकहाती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

अधांर दिसतानाही डगमगण्याची चिंताच नव्हती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

माळून काजव्यांना आल्या निजून राती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

पाहता क्षितिजे सोनेरी कडा दिसत होती
तु आहेस सोबतीला हिच आशा होती

हर्स्षोल्ल्हासे फिरुनी मागे पाहता
पुन्हा काळोखच दिसला,
हे बेचिराख आयुष्य सांभाळण्यास
तु मात्र सोबतीला नव्हतीस,तु मात्र सोबतीला नव्हतीस!!

-अद्वैत
मराठी

Wednesday, January 12, 2011

मरणाचे भय कसले?



कित्येकांना मरणाचे भय असतेच! का कोणास ठाऊक पण असतेच! त्यावरच लिहिलेली कविता!

अरे मरणाचे भय कसले?
भ्याड आपण नाही,
अरे शिवरायांच्या भूमित जन्मलो
भिती रक्तातच नाही!

कितीही भ्यालात तरी
मरण हे येणारच आहे,
का विचार उद्याचा
आजचा दिवस तुमचाच आहे!

रिकमा आलास रिकामाच जाणार
हेच सत्य बाळग मनाशी
मेल्यावरही अमर राहू,
निःश्चय करू स्वतःशी

कितीही संकटे येवोत
ईमान सोडणार नाही,
अरे मरणाचे भय कसले?
भ्याड आपण नाही!
- अद्वैत

Wednesday, December 1, 2010

नकळतच का होईना....!


तुझे ते सुहास्य
माझ्या मनास मोहिले
नकळतच का होईना
माला हेच माझे पहिले प्रेम वाटले!

शब्द तुझे, बोल तुझे
मी तर केवळ ते गुंफिले
नकळतच का होईना
स्वप्नी केवळ तुलाच पाहिले!

तुझ्या त्या डोळ्यांमधे
प्रेमाचे आसव दाटले
नकळतच का होईना
त्यांत मी केवळ मालाच पाहिले!

नव्हते ते माझ्यासाठी
ते आत्ता माला समजले
नकळतच का होईना
तु माला कधीच आपले नाहीस मानले!

Friday, November 5, 2010

माझा पहिला ब्लॉग!

नमस्कार! हा माझा मराठीतला पहिलाच ब्लॉग! आजवर मी इंग्रजीतुन बरेच लिखाण केले आहे पण आता थोडे मराठीत लिहावे म्हणतोय!.तर सादर आहे हा माझा पहिल मराठी ब्लॉग!

इथे मी माला जे जमेल ते लिहिण्याचा प्रयत्न करेन. आशा आहे माझ्या भावना माझ्या ब्लॉग वाचकांपर्यंत पोहोचतील!

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...