Monday, April 25, 2011

आम्हाला तुमचा Feedback हवा आहे

नमस्कार,
आज बरेच दिवस झाले आपण मराठी कॉर्नरवर active दिसला नाहीत! त्यामुळे आम्हाला आपले मत/ feedback जाणून घ्यायचा आहे. गेल्या महिन्यात अचानकच मराठी कॉर्नर थंड पडलेले दिसून आले. जे सतत active असायचे ते देखिल शांत दिसत आहेत! त्यामुळे आम्हाला आपले मत जाणून घ्यायचे आहे. आम्ही सभासदांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न केला आहे तरिही अशी शांतता ? "ये बात कुछ हजम नही होती यार!" त्यामुळे आम्हाला तुमचे मत जाणून घेणे महत्वाचे आहे. कदाचित सभासदांना काही problems येत असतिल, किंवा तुम्हाला काही नवे सुचवायचे असेल तर बिनधास्त  येथे "Feedback" या topicवर आपले मत मोकळेपणाने मांडावे.

तुम्हाला जर काही अडचणी येत असतिल, तुमची प्रोफाईल हाताळताना काही गैरसोयी होत असतिल किंवा याहूनही काही वेगळे problems येत असतिल तर नक्की आम्हाला कळवा! तसेच आमचे सर्व मेल तुम्हाला मिळतात ना? हे देखिल जाणून घ्यायचे आहे. सतत तुम्ही तुमच्या मेलचे "Spam" किंवा "Junk" हे फोल्डर तपासत जा! कारण कधी कधी आमच्याकडून आलेले मेल तेथेही जाऊ शकतात!

आपले मत/Feedback जाणून घेण्यास आम्हाला निश्चितच आवडेल आणि आमचे काही चुकत असेल किंवा आणखी काय सुविधा आमच्या सभासदांना हव्या आहेत हे देखिल जाणून घेण्यास आवडेल!
आपल्या feedbackच्या प्रतिक्षेत!

-marathi corner team

Tuesday, April 12, 2011

रामनवमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!





सियावर रामचंद्र की जय!!!रामनवमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!! :)

Sunday, April 10, 2011

आता मराठी लिहा डायरेक्ट!

नमस्कार मंडळी,
मागिल पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे,  मराठी कॉर्नरच्या सभासदांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात यासाठी मराठी कॉर्नर टिम नेहमीच प्रयत्न करित असते!
गेल्या बर्‍याच दिवसांपासून मराठी कॉर्नरच्या सभासदांना मराठी डायरेक्ट लिहिता यावे यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करित होतो आणि आज या प्रयत्नांना यश मिळाले आहे! मराठी लेखनासाठी एकमेव पर्याय असलेल्या "बराहा"नेही आता सामान्यांना न परवडेल अशी किंमत त्यांच्या सॉफ्टवेअरला लावली आहे आणि त्यामुळे नक्कीच मराठी कॉर्नरवर मराठी लिखाणाची गैरसोय जाणवू लागली होती! पण आता नाही! :-) कारण आजपासून तुम्ही मराठी कॉर्नरवर कधिही, कोठूनही मराठी लिहू शकता आणि तेही "कोणत्याही बाह्य सॉफ्टवेअर" शिवाय!

मग आहे की नाही भारी सोय??? मग करताय ना मराठी कॉर्नरवर लिखाणाला सुरूवात? होताय ना मराठी कॉर्नरवर active? एकवेळ ही सुविधा वापरून पाहाच आणि कोणताही प्रॉब्लेम आलाच तर लगेचच या मेलला रिप्लाय द्या. तसेच डायरेक्ट मराठी लिखाणाची सुविधा चालू किंवा बंदही करता येते. डाव्याबाजूला असलेल्या स्थिर "मराठी लिखाण" या चेकबॉक्सवर टिचकी मारून डायरेक्ट मराठी लिखाणाची सोय चालू किंवा बंद करता येते. ही सुविधा वापरताना काही अडचणी किंवा तुम्हाला यात आणखी काही नविन सुचवायचे असल्यास आम्हाला जरूर मेल करून कळवा! आपल्या सर्व सुचनांचे मराठी कॉर्नर टिम सदैव स्वागतच करेल!

तसेच आजपासूनच "झटक्यात रिप्लाय" ही सुविधा देखिल सादर करित आहोत. या सुविधेमुळे तुम्हाला जर कोणत्याही लेखाला रिप्लाय द्यायचा असेल तर त्या लेखाच्या खालीच रिप्लायचा बॉक्स असेल. त्यामुळे तुमचा वेळ वाचेलच शिवाय रिप्लाय देणे आता जास्त सोप्पे जाईल!

ट्विटर,बझ,ब्लॉग,फेसबुक इत्यादी सोशल नेटवर्कस द्वारे या सुविधेची तुमच्या मित्रमंडळींना माहिती देऊन मराठी कॉर्नरच्या प्रसार व प्रचारात जर आपण काही मदत करू शकलात तर निःश्चितच आम्ही आपले ऋणी राहू. कारण सभासदांचा सपोर्ट नक्कीच आम्हाला नवा जोष, नवी ताकद देऊ शकतो. जेणे करून आणखी मस्त मस्त सुविधा आम्ही मराठी कॉर्नरच्या सभासदांना देऊ शकू.

सदैव आपल्या सेवेत!

मराठी कॉर्नर टिम

Monday, April 4, 2011

तुमचा ब्लॉग जोडा मराठी कॉर्नरच्या नव्या सुचीत!

गेल्या ५ महिन्यांत २०० हुन अधिक सभासद, ३५० हुन अधिक मांडले गेलेले विषय आणि ५०० हुन अधिक लिहिल्या गेलेल्या पोस्टस. तसेच "दै.सकाळ" कडून झालेले जाहिर कौतुक यावरूनच मराठी कॉर्नरची लोकप्रियता लक्षात येते.

आपल्या सभासदांना जास्तित जास्त लाभ मिळावा यासाठी सदैव प्रयत्न करणारी मराठी कॉर्नर टिम आज चैत्रपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आणखी एक अभिमानास्पद सुविधा घेऊन आली आहे. "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा"ला मिळालाय एक नवा लुक!!

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा ही मराठी कॉर्नरने सुरू केलेली ब्लॉगसूची होती. पहिल्यांदा जेव्हा ही सूची सुरू केली होती तेव्हा फक्त ब्लॉगस जोडले गेलेले होते. तेव्हा सभासदांनी लिहिलेल्या ताज्या पोस्टस मराठी कॉर्नरच्या सूचीत येत नसत पण आता तेही सुरू झाले आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून या सुविधेची वारंवार परिक्षा घेण्यात आली आणि आता ही सुविधा पुर्णपणे व्यवस्थित सुरू आहे.

आता मराठी कॉर्नरशी जोडल्या नंतर तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहिलेल्या  नव्या पोस्टस तुमच्या नावानिशी http://www.marathicorner.com/memberblogs/ येथे अपडेट होतील आणि त्याही काही मिनिटांत. आणि हो, तुम्ही लिहिलेल्या पोस्टचे सगळे क्रेडिट तुम्हाला मिळावे म्हणून आम्ही तुमच्या पोस्टचे मुळ दुवे देखिल त्या पोस्टच्या शिर्षकाला जोडतो आहोत. म्हणजे, जर कोणी मराठी कॉर्नरच्या सूचीतून तुमच्या ब्लॉगच्या पोस्टवर क्लिक केले की त्याला तुमच्या ब्लॉगवर आपोआप नेले जाईल!

मग आहे की नाही मस्त सुविधा?? आजच या सुविधेचा लाभ घ्या. तुमचा ब्लॉग मराठी कॉर्नरशी जोडण्यासाठी
http://www.marathicorner.com/memberblogs/attach-your-blog हा फॉर्म भरणे व तेथे दिलेल्या सुचनांचे पालन करणे अनिवार्य राहिल. आणि जर तुम्ही आधीच मराठी कॉर्नशी आपला ब्लॉग जोडला असेल तर आपला ब्लॉग मराठी कॉर्नरच्या जोडले गेलेले ब्लॉग मध्ये आहे याची खात्री करून घ्या. त्यासाठी येथे जावा : http://marathicorner.com/memberblogs/jodalegeleleblog/ यात जर आपला ब्लॉग दिसत असेल तर आपला ब्लॉग आमच्या सूचीत व्यवस्थित जोडला गेला आहे असे समजावे पण जर यात आपला ब्लॉग नसेल तर लगेच मराठी कॉर्नरशी संपर्क साधा http://www.marathicorner.com/contact.php

आजवर ४६ ब्लॉग जोडले गेले आहेत. आशा आहे लवकरच आपलाही ब्लॉग या यादित दिसू लागेल! :D

Wednesday, March 30, 2011

फक्त मीच!

तुझ्या देखणेपणावर मरणारे हजार असतिल
पण तुझ्या निर्मळ मनावर मरणारा फक्त मीच!

तुझ्या हसण्यावर फिदा हजार असतिल
पण तुला मनापासून हसवणारा फक्त मीच!

तुझ्या चिडण्यावर चिडणारे हजार असतिल
पण तुला मनसोक्त चिडवणारा फक्त मीच!

तुझ्या सुखात भागिदार हजार असतिल
पण तुझ्या दुःखात हक्काचा भागिदार फक्त मीच!

तुझ्या अदांना पाहणारे हजार असतिल
पण "तूला" पाहणारा फक्त मीच!

तुझ्या कळत तुझ्यावर प्रेम करणारे हजार असतिल
पण तुझ्याच नकळत तुझ्यावर प्रेम करणारा फक्त मीच! फक्त मीच!


-अद्वैत
http://www.marathicorner.com/memberblogs/

Tuesday, March 29, 2011

"सकाळ"नेही घेतली मराठी कॉर्नरची दखल

दिनांक २५ मार्च २०११ च्या सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये मराठी कॉर्नरवर आधारित श्री. प्रफुल्ल सुतार यांचा एक सुंदर रिव्ह्यू छापून आला आहे.

त्याचा दुवा: http://72.78.249.107/Sakal/25Mar2011/Enlarge/Kolhapur/KolhapurToday/page8.htm


कात्रण:



श्री. प्रफुल्ल सुतार यांचे मनापासून आभार. छोट्या पण सुटसुटीत शब्दात त्यांनी खुप सुंदर परिक्षण केले आहे!

-अद्वैत
मराठी कॉर्नर

Thursday, March 24, 2011

आपल्याला अधिकार आहे?


आज २३ मार्च. ८० वर्षांपूर्वी तिघा क्रांतिकारकांना इंग्रज सरकारने फाशी दिली; का तर त्यांना कायमचे संपवून टाकण्यासाठी पण हेच तिघे भारताच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले. आजचा दिवस शहिद दिन म्हणून ओळखला जातो. शहिद भगतसिंह, शहिद राजगुरू, शहिद सुखदेव यांनी दिलेल्या बलिदानाचे हे जणू प्रतिकच आहे. पण खरच या महान क्रांतिकारकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आपल्याला आधिकार आहे?

आज न्यूज चॅनल पाहात होतो, शहिद दिनाबद्दल बोलण्यासाठी काही मंत्री आतिशय हापापले होते. कोण म्हणत होता, "वो बहुत बडे वीर थे!" , "हम उनके बदौलत यहा है" वगैरे वगैरे! पण खरच त्यांची लायकीतरी आहे या वीरांबद्दल बोलण्याची? जो देश स्वतंत्र व्हावा म्हणून या लोकांनी हसत हसत बलिदान दिले, अशा या देशात एका खुर्चीसाठी हो्णारे वाद, सामान्यमाणसाला कळूही शकणार नाही इतक्या मोठ्या रकमेचे घोटाळे, भ्रष्टाचार, जातीभेद, नोंदी केल्या तर एखादा ग्रंथ तयार होईल असे प्रकार खरच त्यांच्या या बलिदानाची कुचेष्टा करत आहेत! या सर्व गोष्टींना फक्त आणि फक्त आपणच जबाबदार आहोत! मग त्यांच्या या कर्तुत्वाची आठवण व्यक्त करण्याचा आपल्याला अधिकार आहे?


भगत सिंहांना फाशीला नेत असताना त्यांच्याकडे काही कविता होत्या. त्यातिल एक:

भला निभेगी तेरी हमसे क्यों कर ऍ वायज़
कि हम तो रस्में मोहब्बत को आम करते हैं
मैं उनकी महफ़िल-ए-इशरत से कांप जाता हूँ
जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।

काय फरक आहे आपल्यात आणि शहिद भगतसिंगांनी रचलेल्या या कवितेत?  "जो घर को फूंक के दुनिया में नाम करते हैं।" . आपण नेमके हेच करतो आहोत असे वाटत नाही?

आज सर्वत्र त्यांच्या फोटोंचे पुजन होत होते, "इंकलाब झिंदाबाद"चे नारे लागत होते पण खरच हा सर्व दिखावेपणा नाही वाटत? भ्रष्ट सरकाराचे जुलुम सहन करून देखिल गप्प बसणारे आपण कोणत्या अधिकाराने या शहिदांच्या बलिदानाची आठवण व्यक्त करतो?

शहिद दिन आणि क्रांतिकारक दिन हे दोन दिवसच हवेत त्यांच्या क्रांतीच्या तेजाची आठवण ठेवण्यास? ज्यांना साधी भारताची प्रतिज्ञा सोडा राष्ट्रगीतही माहित नाही अशा मेट्रोसिटीतल्या तरुणांकडून जणू काही हे दोन दिवस "साजरे" केल्यासारखेच वाटतात! अरे लाज वाटली पाहिजे या अशा दिखावेपणाची!


गप्प आहे देश सारा
गप्प आहे आमचा स्वाभिमान!
नेतृत्वही लज्जास्पद आहे,
भ्रष्ट आहेत भावना!

एकमेकांस दोष देत
माणूसकीही ओशाळली आहे,
बुद्धीजिवी असू खरे पण
ही किड काही संपेना!

व्यर्थ गेले  प्रयत्न आमचे
व्यर्थ गेले आमचे बलिदान,
ही भावना न राहो त्यांच्या मनी
हीच देवा चरणी प्रार्थना!


-अद्वैत

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...