Sunday, May 1, 2011

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!!
गर्व आहे मराठी असल्याचा! गर्जा महाराष्ट्र माझा!!




3 comments:

  1. अद्वैतजी,
    "१ मे" महाराष्ट्र दिनाच्या आजच्या दिवशी माझ्याही आपणास हार्दिक शुभेच्छा.
    ह्या शुभेच्छा आपणास देत असताना सुद्धा मनात एक विचार चमकून जातो कि महाराष्ट्राचे देशातील स्वतःचे असे जे प्रगत राज्याचे स्थान होते ते आता इतर राज्यांच्या प्रगती मुळे नव्हे आपल्या नालायक राज्यकर्त्यामुळे नि राज्यातील नागरिकांच्या निष्क्रीयते मुळे फारच वेगाने घसरत चालले आहे काय? अगदी साधे पण अतिशय नेमके उदाहरण द्यायचे म्हणजे गेल्या काही वर्षात शेयर बाजाराला १ मे महाराष्ट्र दिनी जी पूर्वी सुट्टी असावयाची ती देणे आता बंद केले आहे.अगदी महाराष्ट्रीयन माणसांच्या नाकावर टिच्चून.विशेष म्हणजे बाजारातील रोजच्या साधारण १ लाख कोटी उलाढालीतील मधील अजून हि ७० टक्क्या पेक्षा जास्तीचा वाटा महाराष्ट्राचा असून हि.हळू हळू इतर त्या तुलनेत (खरे तर तुलना होऊच शकत नाही ) अप्रगत राज्यांचे आंडू पांडू तथाकथित नेते सुद्धा अगदी बिनधास्तपणे खडसावतात कि मुंबई,महाराष्ट्र हा मोठा आहे तो फक्त महाराष्ट्रा मुळे,मराठी माणसा मुळे नाहीये तर इतरां मुळे आहे. आणि आपले हे जातीयवादाच्या दलदलीच्या राजकारणात रुतलेले नेते,कि जे इथे सगळ्यांना वाघ वाटतात जे केंद्रात कागदी वाघ सुद्धा वाटत नाहीत ते हातात बांगड्या भरून मुग गिळून गप्प बसतात.त्या वर ब्र काढत नाही. आपण नक्की कुठं चाललोय? का चाललोच नाहीये? का मागे मागे?

    ReplyDelete
  2. हेच आपलं दुर्दैव आहे की आपल्याला असले फालतू राजकारणी लोक मिळाले! सध्याच्या क्रमवारित बिहारने महाराष्ट्राला विकासात मागे टाकले आहे. यापेक्षा अपमानकारक गोष्ट अजून काही असूच शकत नाही. याचा अर्थ असा नाही की बिहार खराब आहे, पण ज्या अवस्थेत ते होते आणि त्यात त्यांनी जी लक्षणिय प्रगती केली हे बघण्यासारखे आहे!

    महाराष्ट्र दिना विषयी म्हणाल तर ही दोन पानं बघा:
    http://72.78.249.107/Sakal/1May2011/Normal/Kolhapur/page5.htm

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8132647.cms

    आता यांना काय म्हणायच? "प्रेस" हे लोकजागृतीचे मोठे काम पार पाडतात पण फक्त पैसा मिळतो म्हणून स्वतःच्या राज्याबद्दलचा स्वाभिमान बाजूला ठेवून हे लोक असली कामं करतात! काय फरक पडला असता जर यांनी स्वतःहून एखादे पान शुभेच्छा देणारे काढले असते तर? वर्ल्डकप जिंकला तेव्हा ह्यांना कोणी पैसे दिले होते स्वतंत्र पान छापण्याचे? नाही ना? मग तसच महाराष्ट्र दिनासारख्या महत्वपुर्ण दिनी ह्यांना स्वतःचे डोके चालवता येते नाही?

    आणि ते मटावाले! इथे मस्त चुका काढण्यात मजा मानताहेत. सरकार अक्कलशुन्य आहेच पण ह्यांना एवढही डोकं नाही की स्वतःहुन ती चुक दुरुस्त करून नीट छापावे? पण नाही!

    ही सिस्टिम कोठेतरी थांबायला/थांबवायलाच हवी. अण्णा हजारेसारखा वयस्कर माणूस स्वतःची पर्वा न करता उपोषणाला बसतो पण मधेच "कलमाडी"ची केस बाहेर काढून सगळ्यांचे लक्ष दुसरीकडे वळवले जाते आणि हे कोणाच्याही लक्षातही येत नाही!

    आपण सामान्यमाणूस, पडद्यामागे जे काही घडते ते आपल्याला १% देखिल माहित नसते तरी आपण इतके त्याचा विरोध करतो मग विचार करा राहिलेले ९९% सत्य जर बाहेर आलेच तर ते आपण सहन करू शकू?

    ReplyDelete
  3. तुम्हाला reply दिला तोच पोस्ट म्हणून टाकलाय!

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...