Monday, May 2, 2011

लादेनचा मृत्यु: कितपत सत्य?

आज जगातली सगळ्यात आनंदाची आणि किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाची बातमी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी त्यांच्या देशवासियांना आणि संपूर्ण जगाला दिली! आतंकवादाचा अतिउच्च्य कळस ठरलेल्या ओसामा बिन लादेनच्या मृत्यु विषयी! हा व्हिडिओ पाहा. यात बराक ओबामांनी officially लादेनला ’मृत’ घोषित केले आहे! हा व्हिडिओ काळजी पूर्वक ऐका! सोबत मला जमेल अशा शब्दात मी त्याचा मराठीत अनुवाद केला आहे. तो व्हिडिओच्या खाली देत आहे!

अनुवाद:

"नमस्कार, मी आज आमेरिकी नागरिकांना आणि संपूर्ण जगाला सांगू ईच्छितो की अमेरिकेने चालवलेल्या सैनिकी अभियानात "अल-कायदा"चा प्रमुख "ओसामा बिन लादेन" मारला गेला आहे. असा आतंकवादी जो हजारो निष्पाप नागरिक,महिला आणि लहान मुलांच्या खुनाचा जबाबदार आहे. आज जवळजवळ १० वर्ष झाली जेव्हा एक सुरेख सप्टेबरची सकाळ अमेरिकेच्या इतिहासातिल सर्वात वाईट अशी ठरली. (नंतरचे सगळे त्या ९/११ च्या घटनेची माहिती सांगितली आहे. विमान कसे हायजॅक केले, ट्विन टॉवर कसे पडले, त्यामुळे झालेले नुकसान, परिवारांतून कमी झालेले सदस्य, असे ३००० लोक मारले गेले वगैरे वगैरे! ते काही भाषांतरित करण्याची गरज वाटत नाही) नंतर २००१ च्या सप्टेबरला आपण सर्व लोक जाती धर्म विसरून  याची स्मृती ठेवायला आणि त्याचा विरोध करायला एकत्र आलो. आणि लवकरच आम्हाला समजले की अल कायदा नावाच्या संघटनेने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे आम्हीही लगेचच अमेरिकेच्या संरक्षणासाठी त्यांच्या विरोधात उभे राहिलो. जवळ जवळ १० वर्ष अमेरिकी सैन्य जे कार्य़ करित आहे त्यांना मनापासून धन्यवाद! त्यांच्यामुळेच आम्ही तालिबानचे अफगाणिस्तानवरिल राज्य उलथवून लावले जे अल्कायदाने त्यांना बहाल केले होते. आम्ही यशस्वीरित्या भरपूर अतिरेकी मारले ज्यात ९/११ च्या कटात सहभागी असलेले अतिरेकीही होते. पण त्यांचा मुख्य लादेन मात्र अजून सापडला नव्हता आणि अफगाणिस्तान सोडून सिमापार पाकिस्तानात जाण्यात यशस्वी झाला. आणि तेथुन तो जगभर अलकायदाचे नियंत्रण करू लागला. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा लगेचच CIA च्या मुख्यांना आदेश दिले की "ओसामा"ला पकडणे/मारणे हेच आता अलकायदा विरोधातिल युद्धाचे मुख्य ध्येय असेल. त्यानंतर अपार कष्ट घेत आम्ही त्याच्या पाकिस्तानातिल ठावठिकाण्याचा पत्ता लावला. यासाठी मी सतत आमच्या गुप्तचर विभागाशी संपर्कात राहिलो. आणि गेल्या आठवड्यात मला समजले की आमच्याकडे त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध आहे. आज माझ्या आदेशाखाली आम्ही त्या आबादाबाद ठिकाणावर कृती केली. ही कृती एका छोट्या पण असामान्य धाडसी व असामान्य कर्तुत्ववान सैन्य तुकडीने पार पाडली. यात कोणिही सैनिक जखमी झाला नाही आणि कोणिही सामान्य नागरिक मारला जाणार नाही याची दक्षता घेतली गेली. त्यानंतर त्यांनी ओसामा बिन लादेनला ठार केले व त्याचे मृत शरिर ताब्यात घेतले. हे अलकायदा विरोधातिल सर्वात मोठे यश आहे. आम्हाला याची जाणिव आहे की हा शेवट नाही. यानंतरही अलकायदा त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरूच ठेवतील. त्यामुळे आम्ही आता सदैव सतर्क आहोत. यावरून आम्ही हे सांगू ईच्छितोकी ज्याप्रमाणे बुश म्हणाले आणि माझेही म्हणणे आहे की आम्ही "ईस्लाम" विरोधी नाही कारण लादेन "ईस्लाम"चा पुरस्करता नव्हता उलट सगळ्यात जास्त मुस्लिम बाधवांचा हत्यारा होता. त्यामुळे ह्या बातमिचे सर्वांनी स्वागत केले पाहिजे जे शांततेवर प्रेम करतात. गेल्या वर्षांत ज्याप्रमाणे मी म्हणालो होतो की वेळप्रसंगी त्याच्या विरोधात आम्ही पाकिस्तानातुनही कारवाया करू आणि तेच आज आम्ही केले. (आता पकिस्तानचे कौतुक) हे सर्वांनी जाणायला पाहिजे की पाकिस्तानच्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. मी आज झरदारिंशी बोललो आणि त्यांनी हे मान्य केले की आजचा दिवस आम्हा दोन्ही देशांसाठी आनंदाचा दिवस आहे कारण ज्याप्रमाणे लादेनने अमेरिकेशी युद्ध पुकारले होते तसेच ते पाकिस्तानशीही पुकारले होते. आणि आता हे महत्वपुर्ण आहे की पाकिस्तानने आम्हाला अलकायदाविरोधात अशिच मदत करावी. अमेरिकी जनतेला कधिच युद्ध मान्य नाही. एखाद्या सैनिकाची मृत्युची माहिती किंवा जखमी सैनिकाची किंमत आम्हाला या १० वर्षांत सर्वात जास्त कळली आहे. पण या देशाच्या संरक्षणासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. त्यासर्व लोकांना ज्यांनी आपले कुटुंब सभासद अलकायदामुळे गमावले आहेत त्यांना आज आम्ही आभिमानाने सांगू ईच्छितो की आजच्यासारख्या रात्री घडलेल्या घटना "त्यांच्या मृत्यला" न्याय मिळवून देणार्‍या आहेत. आज मी त्या सर्व लोकांना धन्यवाद देऊ ईच्छितो ज्यांनी या कार्यात अहोरात्र मेहनत घेतली. सामान्य नागरिकांना त्यांची नावंही माहित नसतिल पण त्यांना स्वतःला त्यांच्या या कामाबद्दल धन्यता वाटत असेल. (यानंतर ९/११ च्या संबंधीत नागरिकांना सहानभुतीचे चार शब्द) हे आम्ही करून दाखवली की जे आम्ही बोलतो ते आम्ही करतो. धन्यवाद!"

हे झालं बराक ओबामांचे भाषण. आता मला व असंख्य लोकांना पडलेले काही प्रश्न!

१. भाषणात असत "मी","माझ्यामुळे" वगैरे का?
हेच ते पाकिस्तानातिल घर जेथे लादेन मारला गेला असा अमेरिकेचा दावा आहे.
सध्या असं म्हणताहेत की ओबामा सरकार आजवरच अमेरिकेतल सर्वात फोल ठरलेलं सरकार आहे. त्यांनी जे जे वादे केले होते ते ते "वांद्या"त रूपांतरित झाले. असेही वारे सुरू होते की ३ वर्षांनी सरकार कोसळणार आणि पुन्हा निवडणूका होउन नवा राष्ट्रपती निवडून येणार. ओबामाच्या नाकरत्या सरकारामुळेच डोलर कोसळतो आहे आणि अमेरिकेचे जगावरिल प्रभुत्व कमी होतेय. सैन्यावर होणारा खर्च देखिल ७५% कर लावून सर्वसामान्यांकडून घेतला जातोय. मग यात सतत "मी", "माझ्यामुळे" वगैरे वापरून स्वतःचे स्थान वाचवायची धडपड तर ओबामा करत नाहियेत ना? आणि जर हे खरे असेल तर सामान्य अमेरिकी नागरिकांच्या भावनांशी खेळल्याचा निश्चितच ओबामांना पुढे खुप त्रास सहन करावा लागेल!

२. अमेरिकेने/पाकने मिडियाला पुरवलेल्या लादेनच्या मृत्युच्या फोटोवरिल शंका:
मी यावर जास्त टिपणी करणार नाही. कारण मलाही अजुन असा कोणताही पुरावा नेटवर मिळाला नाही जो ही सांगतोय की हे फोटो अमेरिकी सरकारने प्रसिद्ध केले आहेत. पण जगभर हाच फोटो दाखवला जातोय आणि टिका केली जातिये तरिही अमेरिका सरकार गप्प कसे? काही तरी शंकास्पद नक्कीच आहे.

हा फोटो जो पाकिस्तानी मिडियाने प्रसिद्ध केला:
आणि हे त्यावरचे पुरावे की हा फोटो मुळचा "महारूफ साईद" जो २०१० साली मारला गेला, त्याच्यावर फोटोशॉप करून बनवला आहे:
आणि हा पुरावा खराही वाटतो कारण १० वर्षात त्याची दाढी तेवढीच पांढरी आणी जसिच्या तशी? पण ओवरऑलच यात कितपत सत्यता आहे हे माहित नसल्याने जास्त न बोलणेच योग्य.
३.डिएने टेस्ट:
ओबामांनी म्हणे लादेनच्या मृतदेहाची तपासणी झाल्यावर ते कंफर्म करून मगच तो लादेनच आहे जो मारला गेलाय याची माहिती अमेरिकी नागरिकांना व जगाला दिली. पण माझा प्रश्न असा आहे की केवळ ३ तासांत त्यांनी DNA सारखी महत्वपूर्ण तपासणी केली. म्हणजे घटनाक्रम असा असावा. सैनिकांनी त्याला मारलं आणि लगेच त्याच रक्त अमेरिकेला पाठवल. कारण DNA टेस्ट करायला प्रयोगशाळा लागते. ती त्या भागात जेथे टेलिफोनचीही सोय नाही अशा गावात जिथे लादेनला मारलं तिथे उपलब्ध असण शक्यच नाही. आणि आमेरिकेला नाही तर मग इतर प्रयोगशाळेत पाठवल असेल तर त्या DNA शी मॅच करायला अमेरिकी सैन्य काकोटिला सॅंपल घेऊनच फिरत होते. ओबामा म्हणताहेत की एक छोटे पथकाने ही कारवाई केली, मग तिथे कोण उपलब्ध होतं जो हे सर्व तपासणी करेल? आणि एखादी DNA टेस्ट पुर्ण १००% result मिळायला कमितकमी ४-५ तास लागतातच! मग त्याहुनही कमी वेळेत त्याला पुरावा कसा मानला जातो? त्यामुळे हे संपूर्ण DNA दुजोरा शंकास्पद आहे!

४.दफन
आज भारतिय प्रमाणवेळेनुसार अमेरिकेने लादेनचे शव अफगानिस्तानात हलवून समुद्रात खोलवर दफन केले. पण एवढी गडबड का? थोडिच तो मेलेला जागा होणारे? का त्याला का मारला म्हणून कोणी त्याला जाब विचारणार आहे? ज्याप्रमाणे सद्दाम हुसेनच्या मृत्युचे official छायाचित्र प्रसिद्ध केले तसेच याचे करायला काय हरकत होती? हुसेनपेक्षा याचा मृत्यु अमेरिकी नागरिकांना जास्त महत्वाचा आहे. आणि दफनच करायचे होते तर जिथे मारला तिथेच सडू द्यायचा किंवा तिथेच समुद्रात टाकायचा. पुन्हा अफगाणिस्तानात का न्यायचा? आणि इकडे म्हणायच की लादेन मुस्लिमांच्या विरोधात होता आणि इकडे त्याला मुस्लिमांच्या पद्धतिने सन्मानपूर्वक दफन करायचे. हा विरोधाभास का? यातही शंकाच निर्माण होते!

५.राजकिय डावपेच
मध्येच पाकिस्तानचे कौतुक करून त्यांना पाठिशी घालायचे. म्हणजे उद्या कोणीतरी (थोडक्यात भारत) म्हटल की "पाकिस्तान हाच आतंकवादाला जबाबदार आहे" तर पाकिस्तान ठामपणॆ याला विरोध करू शकतो. आणि ओबामाचे बोल ढालिसाखे वापरू शकतो. थोडक्यात ओबामा+पाकिस्तान= राजकिय स्थिरता.

मी जे काही लिहिले आहे ते सध्या न्युज चॅनलवर दाखवलेल्या माहितिच्या आधारे लिहिले आहे. यातिल काही मुद्दे बिनबुडाचे असतिल पण निदान काहिततरी तथ्य असेलच ना? मग खरच लादेनचा मृत्यु: कितपत सत्य?

8 comments:

  1. पटतंय तुमचं म्हणणं.बरेच जण अशी शंका व्यक्तं करताएत आणि या घटनेसाठी आज पहाटेचाच मुहुर्त का? हे येणारा काळ सांगेलंच! नाही? आभार!

    ReplyDelete
  2. फक्त एकच आशा आहे हे ओबामा सरकारचा फालतूपणा नसावा. जर तसे ठरले तर निश्चितच ओबमाला देश सोडावा लागेल! :) आणि जर लादेन जिवंत असेल तर तो स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची चूक अजिबातच करणार नाही तर गुप्तपणे चालवलेली कुरकर्मे आणखी जोरात सुरू करेल जे कधिही व्ह्यायला नको ही देवाचरणी प्रार्थना!

    ReplyDelete
  3. अद्वैत, कृपया खालील लिंक पहा :

    http://t.co/FzKyBhb

    ReplyDelete
  4. @Sameeksha Netke

    हा! हेच तर माझेही म्हणणे आहे! ती लिंक दिल्यादद्दल धन्यवाद! त्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, अत्ता पर्यंत नव्यात नवा व्हिडिओ हा २००१ सालीच मिळाला आहे. जर लादेनला स्वतःचे अस्तित्व आमेरिकेला दाखवून त्यांना जास्तच सतवायच असत आणि ते तो करण्यास सक्षमही होता तर मग त्यानंतर त्याच्या अस्तित्वाचा एकही पुरावा नाही? असो! आता "विकीलिक्स"कडेच लक्ष ठेवायला पाहिजे! कदाचिअत तेच याचा काय तो खरा तपास लावतिल! पण ही शंका मात्र खरच सतावत राहिल की लादेनचा आमेरिकेने केलेला खात्मा, कितपत सत्य?

    ते काहिही असो सध्या नेटवर जे बोलल जातय ते मात्र खर आहे "लादेन" मेल्यानंतर एक गोष्ट मात्र सिद्ध झाली; "पाकिस्तानात अतिरेकी देखिल सुरक्षित नाहित" :D :D lolz!
    -अद्वैत

    ReplyDelete
  5. "पाकिस्तानात अतिरेकी देखिल सुरक्षित नाहित">>
    हो ना, आजची बातमी..दाऊद कराचीतून पळाला !

    ReplyDelete
  6. @विशाल
    हे तर होणारच होतं! आणि जरी तो सापडलाच तरी तो वयोवृद्ध होऊन मरेपर्यंत त्याला काय शिक्षा होणार नाही! त्यामुळे त्याला सांगायला पाहिजे, बाबा तू सरळ भारतातच ये! इथेच तू जास्त सुरक्षित राहशील! :D :D

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...