ज्यांना माझ्याप्रमाणाचे प्रथमदर्शी यात काय प्रॉब्लेम आहे हे कळाले नसेल तर कृपया त्यावर क्लिक करून? full size फोटो बघा. |
हे पाहिल्यावर असले आणखी काय काय जगात चालू आहे याचा आढावा घ्यायला सुरवात केली. माझा विश्वास करा, एखाद्या तापट मस्तकाच्या माणसाने जर आधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलाच स्वतःचा PC क्षणात फोडेल हो! याची एक झलक:
ही केवळ एक झलक आहे, म्हणा १०% आहे; इतका हलकटपणा जगात चालू आहे आणि आपण गप्प कसे हाच मला प्रश्न पडलाय! की सर्वजण माझ्यासारखेच याबद्दल अजून अज्ञानी आहेत? कदाचित तसेच आहे हे समजून हे सर्व आज मी तुम्हाला कळावे म्हणून प्रसिद्ध करत आहे. ह्या पापाला प्रसिद्धी देणे हे देखिल पाप आहे हे मला मान्य आहे पण हे पाप माझ्याकडून घडले तरी चालेल पण माझ्यासारख्या असंख्य हिंदू बांधवांच्या श्रद्धेशी खेळणार्या या कंटकांबद्दल शक्य तितक्या लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हे लिहिले.
असे नाही की जगात फक्त हिंदूच हिंदू देवांना मानतात, तुम्हाला माहिती असेल कदाचित, मध्यंतरी हॉलिवूड स्टार जिम केरी ने गणपतीबाप्पांवर प्रक्षोभक विधान केल्यावर जितका हिंदूंकडून विरोध झाला तितकाच खुद्द हॉलिवूडमधूनही विरोध झाला! तेव्हा कळालं की गणपतीबाप्पाना गोल्डी हॉन सारख्या मोठ्या दिग्दर्शीका देखिल मानतात. म्हणजेच जगात इतर लोकांनाही इतर धर्माबद्दल माहिती आहे. याचा अर्थ असाच होतो की हा जो काही प्रकार घडलाय हा "घडवून" आणलाय. थोडक्यात आता आपण दंगा केला की आपोआपच त्यांचे मार्केटमध्ये नाव होते! थोडक्यात बॉलिवूडवाले जसा एखादा सिनेमा चालावा म्हणून कॉंट्रावर्सी तयार करतात मग आपोआप आपल्यासारखा सामन्य माणूस "है! तो असा म्हणाला त्याला "त्या" सिनेमाबद्दल" म्हणत नकळत त्या सिनेमाचे प्रमोशन करत बसतो! तसाच प्रकार बहुदा या नीच लोकांनी चालवला आहे. म्हणजे उद्या करोडो हिंदूंनी याचा विरोध केला की आपोआपच करोडो जनतेला या फॅशन डिझाइनरचे नाव कळणार आणि आपोआपच ती बया "जगप्रसिद्ध" हा स्टेटस लावून मिरवणार!
म्हणजे थोडक्यात दोन्ही बाजूने आपलीच गोची! बोलावे तरी बोंब, न बोलावे तरी बोंब! पण काहीही असो हे जरा अतीच होतयं असं वाटत नाही?
-अद्वैत
http://www.marathicorner.com/viewtopic.php?f=15&t=437
No comments:
Post a Comment