आत्ता पर्यंत या सरकारने कित्येकवेळा सामान्य माणसाच्या भावना दुखावल्या आहेत. घोटाळ्यांची तर यादीच निघेल. तरिदेखिल निर्लज्जपणे सगळ चालू आहे! २जी घोटाळा काय नी कॉमनवेल्थ घोटाळा काय, या घोटाळ्यात खाल्लेले पैसे जर चांगल्या कामासाठी वापरले गेले असते तर निश्चितच काहितरी नक्कीच साध्य झालं असतं. इकडे रामदेवबाबा "काळा पैसा आणा, काळा पैसा आणा" म्हणून ओरडत आहेत पण ह्या घोटाळ्यातल्या पैश्याबद्दल कोणीच काही बोलत नाहिये! मान्य की लोक पकडले, कारवाई सुरू आहे, वगैरे वगैरे पण ते पैसे गेले कुठे???
असो, याच विषयावर मी आज पहिलं मोठे व्यंगचित्र काढले आहे. "मॅडम का ढाबा". साहजिकच यात कोणाला उद्देशुन काढले आहे ते समजले असेलच! :)
तर आपले स्वागत हे "मॅडम का ढाबा" मध्ये. आजचे मेन्यू: २जी घोटाळा, CWG घोटाळा, आदर्श आमटी, कलमाडी फ्राय, इत्यादी बरेच काही. आणि हो, सगळे विषय भट्टीत इतके खरपूस भाजले आहेत की चव नक्कीच आवडेल! :D
|
या आधी मी बरिच व्यंगचित्र काढली पण अगदी छोटी, टाईमपासवाली, पण हे माझं पहिलं मोठं व्यंगचित्र! तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा! :) |
वाह... छान उपरोधिक...
ReplyDelete:) thanks!
ReplyDeleteमॅडम का ढाबा...लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteअद्वैत.
ReplyDeleteखूपच छान... व्यंगचित्रकार हि कला सध्याच्या युगात खूप दुर्मिळ होत चालली आहे.त्यातून राजकीय व्यंगचित्रे नि चित्रकार तर शोधून सापडत नाही...त्या मुळेच आपण हि कला आवर्जून जपावी असे आग्रहाचे सांगणे आहे.खरे तर आजच्या नवीन राजकीय नेत्यांची व्यंगचित्रे काढण्या एवढे ते मोठे हि नाहीत नि त्याही पेक्षा त्यांचे रहाणीमान,दिसणे, वागणे,लकबी ते अगदी ड्रेस कोड हे वैशिष्ट्य पूर्ण देखील नाही हि खरी गोम आहे.जे हिंदी सिनेमातल्या हिरो हिरोईन चे झाले तेच इथे हि होताना दिसते.पुण्यात डेक्कन वर १५ मिनिटे जरी थांबल तरी २५ प्रियांका नि ५० शाहीद कपूर नजरेस पडतात.आज ठीक आहे त्यांची नाव झालीयेत पण वैशिष्ट्य पूर्ण असा सामान्या मधला असामान्य चेहरा खास करून हिंदी सिनेमातून पण हरवला आहे.. त्या मुळे आपल्या समोर तसे खरे तर हे चॅलेन्जच आहे पण आपण ते यशस्वीरित्या पेलाल अशी खात्री आहे.आपणास मनःपूर्वक शुभेच्छा.
@mynac
ReplyDelete:) खरयं! आणि धन्यवाद!