वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मराठी कॉर्नरच्या सर्व सभासदांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
विकिपेडियावर दिलेली अक्षय तृतीयेची माहिती सोबत देत आहोत! (साभार विकिपेडिया)
अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त आहे. आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करतात व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे घागरीएवढे मडके आणून,त्यात पाणी भरुन त्यात वाळा टाकतात.त्याने या पाण्याला सुगंध येतो.पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो.असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानतात.
या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ 'अक्षय्य'(न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. (त्यामुळेच बहुदा बायका सोने खरेदीवर जास्त भर देतात! विनोद आहे! जास्त मनावर घेऊ नका!) या दिवशी बद्रिधामावर बद्रिनारायणाच्या मंदिरात प्रथम प्रवेश मिळतो.वृंदावनात कुंजबिहारी श्रीकृष्ण मंदिराचे दरवाजेपण उघडले जातात. ही विष्णूचा एक अवतार समजल्या जाणार्या परशुरामाची जन्मतिथी आहे.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्षय तृतीयेच्या आपणास सुद्धा हार्दिक शुभेच्छा.धन्यवाद
ReplyDelete:) धन्यवाद!
ReplyDelete