Tuesday, March 1, 2011

Tour-de-passport office: एक अनुभव! (Part 1)

एप्रिल २०१० दरम्यान गावातल्याच एका एजंटला धरून "मिशन पासपोर्ट" सुरू केले. आई,बाबा आणि माझा अश्या तिघांचे पासपोर्ट काढण्याची जबाबदारी त्याला दिली. शेवटी एजंटच तो, थोडे खिसे गरम करावे लागले पण आशा होती काम सुखाने पार पडेल. त्यानेही अगदी उत्साहात कामाचा श्रीगणेशा केला. लागलीच फॉर्म भरून घेतला, हवी असलेली डॉक्युमेंट्सची लिस्ट दिली, आम्हीही तातडीने सर्व कागदपत्रे त्याच्याकडे सुपुर्त केली. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जवळ-जवळ १ महिना गेला. पण खुष होतो कारण पासपोर्ट येणार होता.एजंटने सांगितले, " काहिनाही बगा सायेब, जास्तीत जास्त दोन महिनं लागतिल बगा पुलिस इंक्वायरी यायला आनि त्यानंतर १ मइन्यात पासपोर्ट तुमच्या हातात!". चला म्हटलं एकदाची काम झाले.

२ महिने झाले,३ महिने झाले आजुन काही पत्ता नाही पोलिस इंक्वायरीचा. शेवटी ४ महिन्यांनी बाबांनी त्याला फोन केला तर माहाशयांचे उत्तर, "अवो काय करनार सायेब, ते नवं आपिसर आलय आन त्यानं सगळी डोक्योमेन्टस परत पाठवलियेत. आता मी त्यी परत पाठवालोय". त्यावेळी थोडी भिती वाटली कारण सगळी ओरिजिनल डॉक्युमेंटस त्याच्याकडे होती, पण त्याने सांगितल्याप्रमाणे त्यानंतर २ महिन्यांनी पोलिस इंक्वायरी झाली, सगळे कागद तपासून साहेबांनी केस "क्लिअर" केली आणि सांगितले की २ महिन्यांत पासपोर्ट मिळेल.

त्यादिवसानंतर पासपोर्ट स्टेटस रोज बघायचा जणू नादच लागलेला. साहेबांनी सांगितल्यानुसार एक-दिड महिन्यांनी आई आणि बाबा दोघांचे स्टेटस बदलून "Passport is dispatched" असे झाले पण आजून माझा स्टेटस "Police inquiry is pending" असाच होता. २ आठवड्यात दोघांचे पासपोर्ट आलेपण, पण माझ्या स्टेटसमध्ये काहिच बदल नाही. थोडी चिंता वाटली म्हणून पोलिस ठाण्यात जाऊन साहेबांची गाठ घेतली तर कळाले की माझी कागदपत्रे फेरपडताळणीसाठी आली आहेत! आणखी एक धक्का! पण साहेबांनी काही त्रास दिला नाही, लगेच पुन्हा क्लिअर करून पाठवली.

गेल्या महिन्यात म्हणजे साधारण २२-२३ जानेवरी २०११ दरम्यान स्टेटस बदलून "Passport will dispatched on 28th January 2011" असा आला! खूप आनंद झाला! नंतर २८ तारिख गेली, २९ गेली, असे करत करत २० फेब्रुअरी आली पण स्टेटस आजून तसाच. पोस्टात जाउन आलो तर तिथेही पासपोर्ट आला नव्हता. पण २१ तारखेला एक पत्र आले. पासपोर्ट ऑफिसकडून होते ते! आणि त्यात लिहिले होते की "तुमच्या राहत्या पत्त्याची पडताळणी पुणे पासपोर्ट ऑफिसमध्ये सोम-शुक्रवार सकाळी १० ते १२ या दरम्यानच येऊन पूर्ण करावी. ही पुर्तता तीस दिवसांच्या आत न झाल्यास तुमची फाईल बंद केली जाईल!". लागलीच मी पत्रावरची तारिख बघितली तर ती १७/१/२०११ अशी होती! आणखी एक धक्का! कारण ते पत्रच मला ३४ दिवसानंतर मिळालेलं! म्हणले ३० दिवसाची मुदत मला ते पत्र मिळण्याआधीच उलटून गेली होती!  मला कळायचेच बंद झाले! हा काय प्रकार! २०-२५ डॉक्युमेंटस देऊन देखिल पुन्हा पत्त्याच्या पडताळणीसाठी तिच डॉक्युमेंटस घेऊन जायची? तेही अडिचशे किलोमिटरचा प्रवास करून? आणि फाईल चालू ठेवली आहे याची शाश्वती नाहीच! पण काहीही झाले तरी पासपोर्टचे काम होते म्हणून जायचे निश्चित केले!

क्रमश:

2 comments:

  1. जर तुम्हाला या प्रकरणात कुठे लाच द्यावी लागली असेल तर ती इथे नमूद करा.
    http://ipaidabribe.com/

    ReplyDelete
  2. नमस्कार,
    माझे सुदैव म्हणा किंवा ही सिस्टिम खरच सुधारलेलीये असे म्हणा पण यामध्ये मलातरी कोठेही खिशाला हात लावावा लागला नाही! :) बाकी लोकांचे, जे पासपोर्ट सुरुवातीपासून काढत होते तिथे त्यांच्याबद्दल काही सांगू शकत नाही. तरिही आपण दिलेली लिंक मी सांभाळून ठेवतो. कदाचित भविष्यात उपयोगी येईल. (न येवो हिच ईच्छा पण "ये इंडिया है" :) )

    ReplyDelete

Ratings and Recommendations by outbrain

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...